Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

उदगीर घर चोरी

उदगीरमध्ये पत्रकाराच्या घरात चोरी; दीड लाखांचा ऐवज लंपास

Udgir house theft: उदगीर शहरातील औरंगपुरा गल्ली परिसरात पत्रकाराच्या घराचे दार उघडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील कॅमेरा व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोर


उदगीरमध्ये पत्रकाराच्या घरात चोरी दीड लाखांचा ऐवज लंपास

Udgir house theft |

उदगीर (Udgir house theft) : उदगीर शहरातील औरंगपुरा गल्ली परिसरात पत्रकाराच्या घराचे दार उघडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील कॅमेरा व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुदस्सीर मुशीर ठाणेदार (वय ३४, रा. औरंगपुरा गल्ली, उदगीर) यांच्या घरात १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून १७ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराचे दार उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर (Udgir house theft) कपाटाचे दार उघडून त्यातील साहित्य लंपास केले.

चोरट्याने कॅनन कंपनीचा काळ्या रंगाचा जुना वापरातील कॅमेरा (किंमत ६० हजार रुपये), अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत ७० हजार रुपये) आणि पाच ग्रॅम वजनाची सोन्याची फुले (किंमत २० हजार रुपये) असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक ३६३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेडेकर करीत आहेत.