Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

बनशेळकी धरण आत्महत्या प्रकरण

एक फोन...पोलिसांची धाव...अन् मृत्यूला लागला ब्रेक!

Banshelki Dam Suicide Case:


एक फोनपोलिसांची धावअन् मृत्यूला लागला ब्रेक

Banshelki Dam Suicide Case |

 

बनशेळकी धरणावर महिलेचा टोकाचा निर्णय; डायल ११२च्या तत्परतेने वाचले प्राण!

हणमंत केंद्रे
उदगीर (Banshelki Dam Suicide Case) :
लातूर जिल्ह्य़ातील उदगीर ग्रामीण भागातील बनशेळकी येथे कौटुंबिक वादातून भावनिक झालेल्या एका महिलेने बनशेळकी धरण परिसरात टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, डायल ११२ वर मिळालेल्या माहितीवर उदगीर ग्रामीण पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतल्याने महिलेचे प्राण वाचले. पोलिसांनी महिलेला सुरक्षित ताब्यात घेत तिचे समुपदेशन करून अखेर तिला तिच्या भावाच्या स्वाधीन केले.

कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादानंतर संबंधित महिला बनशेळकी धरण परिसरात असल्याची आणि ती आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या मनःस्थितीत असल्याची माहिती डायल ११२ वर प्राप्त झाली. माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्तव्यावरील पोलीस अंमलदार फारूख शेख यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यावेळी महिला टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत तिला सुरक्षित ताब्यात घेतले.

दरम्यान, (Banshelki Dam Suicide Case) घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिलेचे पती आणि भाऊ घटनास्थळी दाखल झाले. महिलेला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिच्याशी संवाद साधत समुपदेशन करण्यात आले. कौटुंबिक परिस्थिती, मानसिक तणाव आणि गैरसमजुतींबाबत चर्चा करून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्याबाबत तिला समज देण्यात आली.

पोलिसांनी घेतलेल्या सविस्तर जबाबातून संबंधित महिला गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे समोर आले. प्रकृती अस्वस्थ असतानाही पतीने तिची विचारपूस केली नसल्याने ती नाराज होती. त्यातून भावनिक झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तिचा सविस्तर जबाब नोंदवून आवश्यक कार्यवाही केली आणि तिला सुरक्षितपणे तिच्या भावाच्या ताब्यात दिले.

एसपींच्या सूचनांना प्रत्यक्ष कृतीची जोड
डायल ११२ वर येणाऱ्या प्रत्येक फोनकडे गांभीर्याने पाहून केवळ माहिती नोंदविण्याऐवजी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून मदत करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिल्या आहेत. उदगीर ग्रामीण पोलिसांनी या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करत एका महिलेपर्यंत वेळेत मदतीचा हात पोहोचविला.

एक फोन... एक धाव... आणि एक जीव वाचला!
संकटाच्या क्षणी मदतीसाठी पुढे येणारी डायल ११२ यंत्रणा केवळ आपत्कालीन सेवा नसून अनेकांसाठी जीवनाची शेवटची आशा ठरू शकते. एखाद्या व्यक्तीच्या जीविताला धोका असल्याचे जाणवल्यास नागरिकांनी तातडीने डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा पोलिसांनी केले आहे.

एसपी अमोल तांबे यांच्या ‘फोनवर न थांबता घटनास्थळी धावा’ आदेशाचा परिणाम
डायल ११२ वर मदतीसाठी येणाऱ्या प्रत्येक कॉलची गांभीर्याने दखल घेऊन फक्त फोनवर चौकशी न करता प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचा, परिस्थिती हाताळा आणि गरजूंना मदत करा, अशा स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत. उदगीर ग्रामीण पोलिसांनी या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत घटनास्थळी धाव घेतली आणि एका महिलेचे प्राण वाचविले. एक फोन, पोलिसांची तत्पर धाव आणि वेळीच झालेला हस्तक्षेप—यामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर गेलेले आयुष्य पुन्हा सुरक्षिततेच्या वाटेवर आले.

संकटात ‘११२’ ठरते आशेचा किरण
आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ ही केवळ मदत मागण्याची सेवा नसून संकटग्रस्त व्यक्तीपर्यंत तातडीने पोहोचणारी जीवनरक्षक यंत्रणा ठरू शकते. एखाद्या व्यक्तीच्या जीविताला धोका असल्याचे जाणवल्यास नागरिकांनी वेळ न दवडता डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा पोलिसांनी केले आहे.

Related to this topic: