Tree Cutting

कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात मनसे आक्रमक; २८ ऑक्टोबरला राज ठाकरे देणार भेट

कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात मनसे आक्रमक; २,०७५ झाडे तोडल्याचा दावा. २८ ऑक्टोबरला राज ठाकरे जंगलाची पाहणी करून सभा घेणार.

कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात मनसे आक्रमक; २८ ऑक्टोबरला राज ठाकरे देणार भेट

Tree Cutting

टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी २,०७५ झाडे तोडल्याचा दावा; परवानगी आणि पुनर्लागवडीच्या जागेबाबत संदीप देशपांडे यांचे सवाल

कर्जत तालुक्यातील वृक्षतोडीचा मुद्दा आता राजकीय वर्तुळातही तापला आहे. टोरेंट कंपनीसाठी जंगलातील झाडे तोडली जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे २८ ऑक्टोबरला कर्जत दौऱ्यावर येणार असून, जंगलाची पाहणी केल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता पोलीस ग्राउंडवर सभा घेणार आहेत.

या दौऱ्यात राज ठाकरे भीमाशंकरला भेट देऊन ग्रामस्थ आणि आदिवासी नागरिकांशी चर्चा करणार आहेत. कर्जतमधील जंगलात आतापर्यंत २,०७५ झाडे तोडण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. आणखी झाडे तोडली जाण्याची शक्यता असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

वृक्षतोडीला परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. ९० हजार झाडे लावण्यासाठी जागा कुठून आणणार, असा प्रश्नही त्यांनी विचारला. गावातील नागरिकांना रस्त्याच्या कामासाठी परवानगी मिळत नसताना वृक्षतोडीला मंजुरी कशी मिळाली, याचे उत्तर द्यावे, अशी मनसेची मागणी आहे. ग्रामपंचायतीने वृक्षतोडीसंदर्भात कोणताही ठराव केला नसल्याचाही दावा देशपांडे यांनी केला.

जंगलातील दृश्य विदारक असून, सुमारे १५० वर्षांपासून उभी असलेली झाडे आणि आयुर्वेदिक वनस्पती तोडण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. प्रकल्पाला ‘ग्रीन’ म्हणत असताना झाडे कापली जात असल्याबद्दल देशपांडे यांनी मुख्यमंत्री आणि प्रशासनावर टीका केली. “दिल्लीतील दोन लोक सह्याद्रीचे भविष्य ठरवू शकत नाहीत,” असे म्हणत त्यांनी निसर्गाचा ऱ्हास करून विकास नको, अशी पक्षाची भूमिका मांडली.

२८ ऑक्टोबरला राज ठाकरे जंगलाची पाहणी करून जाहीर सभा घेणार आहेत. वृक्षतोडीविरोधात त्या दिवशी पूर्ण ताकदीने आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

संबंधित सामग्री

राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंना धक्का देणारी खेळी! छावा संघटनेचे ३५० कार्यकर्ते मनसेत दाखल

राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंना धक्का देणारी खेळी! छावा संघटनेचे ३५० कार्यकर्ते मनसेत दाखल

राज ठाकरेंच्या मनसेला दक्षिण रत्नागिरीत मोठे बळ! छावा संघटनेचे ३५० कार्यकर्ते आणि शिंदे गटातील पदाधिकारी मनसेत दाखल.

Nov 16, 2026
जिल्हा परिषद आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! SC-ST साठी ठराविक जागा राखीव ठेवण्याचा हक्क नाही

जिल्हा परिषद आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! SC-ST साठी ठराविक जागा राखीव ठेवण्याचा हक्क नाही

जिल्हा परिषद आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! SC-ST प्रवर्गासाठी विशिष्ट मतदारसंघ कायम आरक्षित ठेवण्याचा हक्क नसल्याचे स्पष्ट.

Nov 16, 2026
धरणांची पाणीपातळी घसरली; राज्यात केवळ 64 टक्के पाणी शिल्लक!

धरणांची पाणीपातळी घसरली; राज्यात केवळ 64 टक्के पाणी शिल्लक!

Maharashtra Dam Water Storage: धरणांमधील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली असून, राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ 64.17 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा 90.54 टक्के

Nov 16, 2026
मोफत वीज कागदावरच; शेतकरी मात्र अंधारात!

मोफत वीज कागदावरच; शेतकरी मात्र अंधारात!

Farmers Free Electricity Scheme: शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा सरकारकडून मोठ्या दिमाखात केली जात असली, तरी प्रत्यक्षात अपुरा वीजपुरवठा आणि पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Nov 16, 2026
अजित पवारांच्या पुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

अजित पवारांच्या पुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

अमित शाह यांच्या हस्ते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; दादांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भावूक, म्हणाल्या खचून जाणार नाही!

Nov 16, 2026