तंबाखूयुक्त दंडात्मक कारवाई

जवळा बाजार येथे तंबाखूयुक्त पदार्थ विकणाऱ्या दुकानावर दंडात्मक कारवाई

Tobacco Products Punitive Action: जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार अधिष्ठाता श्रीचक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जवळा-बाजार

जवळा बाजार येथे तंबाखूयुक्त पदार्थ विकणाऱ्या दुकानावर दंडात्मक कारवाई

Tobacco Products Punitive Action

हिंगोली (Tobacco Products Punitive Action) : जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार अधिष्ठाता श्रीचक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने जवळा-बाजार शहरातील किराणा दुकानांसोबत अवैधरित्या तंबाखूयुक्त पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांवर दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाभरात ही कारवाईची मोहीम पुढेही चालूच राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

ही (Tobacco Products Punitive Action) कारवाई जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे अधिकारी जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी सोशल वर्कर आनंद साळवे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड आदी उपस्थित होते.