तिरोडा बोदलकसा धरण

एनडीएसएचे पथकाकडून बोदलकसा धरणाची पाहणी; दुरुस्तीनंतर तांत्रिक चौकशी सुरू

Tiroda Bodalkasa Dam: पिंडकेपार गावाजवळ असलेल्या ऐतिहासिक बोदलकसा जलाशयाची पाळ फुटल्याच्या दुर्घटनेनंतर या घटनेची सखोल तांत्रिक चौकशी करण्यासाठी आणि बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी

एनडीएसएचे पथकाकडून बोदलकसा धरणाची पाहणी; दुरुस्तीनंतर तांत्रिक चौकशी सुरू

Tiroda Bodalkasa Dam

 

केंद्रीय पथकाकडून कागदपत्रे व घटनास्थळाची बारकाईने पडताळणी

तिरोडा/ गोंदिया (Tiroda Bodalkasa Dam) : तालुक्यातील पिंडकेपार गावाजवळ असलेल्या ऐतिहासिक बोदलकसा जलाशयाची पाळ फुटल्याच्या दुर्घटनेनंतर या घटनेची सखोल तांत्रिक चौकशी करण्यासाठी आणि बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाचे  विशेष पथक मंगळवारी घटनास्थळी दाखल झाले. या पथकाद्वारे धरणाचे मूळ आरेखन, पाणलोट व गेट ऑपरेशन डेटा, मागील पाझर नोंदी, तपासणी अहवाल आणि आपत्कालीन प्रतिसादाचा तपशील यांसारख्या तांत्रिक दस्तऐवजांची बारकाईने पडताळणी केली जात आहे. 

सन १९१७ साली बांधकाम पूर्ण झालेल्या आणि तब्बल १०९ वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या या ब्रिटिशकालीन (Tiroda Bodalkasa Dam) धरणाच्या डाव्या कालव्याच्या विमोचकाजवळ १२ ऑक्टोबर  रोजी सकाळी ६:३० वाजता मातीचा पाण्याचा बांध फुटला होता. मात्र, जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाच्या तत्परतेने आणि अथक प्रयत्नांमुळे अवघ्या काही दिवसांतच म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० वाजता फुटलेल्या पाळीतून वाहणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे रोखण्यात यश आले होते. पाण्याचा विसर्ग यशस्वीरीत्या थांबविल्यानंतर आता या दुर्घटनेमागील मूळ तांत्रिक कारणांचा शोध घेण्यासाठी तसेच धरण व लगतच्या संरचनांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी केंद्रीय पथकाकडून ही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे.

दरम्यान राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण पथकाचे सदस्य एनडीएसए-पश्चिम क्षेत्र, पुणेचे प्रादेशिक संचालक हरीश उमबेरजे, नियमन कक्ष, एनडीएसए, नवी दिल्लीचे उपसंचालक नरेंद्र मीना, डी अँड आर विंग, एनडीएसए, नवी दिल्लीचे उपसंचालक ऋषभ विजयवर्गीय यांच्या पथकाने धरणाचे मूळ आरेखन, पाणलोट व गेट ऑपरेशन डेटा, मागील पाझर नोंदी, तपासणी अहवाल आणि आपत्कालीन प्रतिसादाचा तपशील यांसारख्या तांत्रिक दस्तऐवजांची बारकाईने पडताळणी केली. 

एनडीएसएच्या या विशेष पथकाला संपूर्ण सहकार्य करण्यासाठी आणि समन्वयासाठी गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर.जी.कुरेकर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच (Tiroda Bodalkasa Dam) धरण पाहणीदरम्यान धरण सुरक्षा पथक, उपविभागीय अभियंता (तिरोडा पाटबंधारे उपविभाग), संबंधित उपअभियंता, सर्व कालवा निरीक्षक आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

टैग्स: Tiroda Bodalkasa Dam