Tiger Attack

सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा धुमाकूळ; भेंडाळा येथील शेतकरी महिलेचा मृत्यू

खातगाव–लाडबोरी शिवारात वाघाच्या हल्ल्यात भेंडाळा येथील प्रेमिला महाडोरे यांचा मृत्यू; दोन दिवसांत सिंदेवाही परिसरात दोन घटना.

सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा धुमाकूळ; भेंडाळा येथील शेतकरी महिलेचा मृत्यू

सिंदेवाही : सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असून, रविवारी दुपारी खातगाव–लाडबोरी शिवारात शेतात काम करणाऱ्या भेंडाळा येथील महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी पळसगाव (जाट) येथे वाघाच्या हल्ल्याची घटना घडली होती. दोन दिवसांत दोन घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तिळ कापणीदरम्यान हल्ला

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव प्रेमिला पुंडलीक महाडोरे (वय ५३, रा. भेंडाळा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या पतीसोबत खातगाव–लाडबोरी शिवारातील शेतात तिळ कापणीसाठी गेल्या होत्या. रविवारी दुपारी सुमारे ३ वाजता त्या शेतात काम करत असताना त्यांचे पती काही अंतरावर होते. त्याच वेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. प्रेमिला महाडोरे अंगणवाडी सेविका होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि एक मुलगी असा परिवार आहे.

दोन दिवसांत सलग दोन हल्ल्यांच्या घटना घडल्याने सिंदेवाही आणि लगतच्या ग्रामीण भागातील शेतकरी चिंतेत आहेत. पिकांची कापणी आणि मशागतीचा हंगाम सुरू असताना वाघाचा वावर वाढल्यामुळे शेतात जाणे धोकादायक ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. हिंस्र वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा आणि बाधित कुटुंबाला योग्य मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति मे. टन 4200 रुपये अंतिम दर द्या!

उसाला प्रति मे. टन 4200 रुपये अंतिम दर द्या!

Latur Farmers' Organization: पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसाला प्रति मेट्रिक टन 4200 रुपये अंतिम दर मिळावा, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याचा ऊस चाऱ्यासाठी 4000 रु

Nov 12, 2026
‘विलिनीकरण ठरले तर आम्हाला सांगतील’; राष्ट्रवादीच्या चर्चांवर फडणवीसांचे भाष्य

‘विलिनीकरण ठरले तर आम्हाला सांगतील’; राष्ट्रवादीच्या चर्चांवर फडणवीसांचे भाष्य

NCP विलिनीकरणावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान. शरद पवार, सुनेत्रा पवार, गोकुळ वाद आणि बिश्नोई टोळीवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.

Nov 10, 2026
'गोकुळात कृष्ण वाढतो, मंत्रालयात कंस बोटं मोडतो'; विवेकानंद पाटलांचा टोला!

'गोकुळात कृष्ण वाढतो, मंत्रालयात कंस बोटं मोडतो'; विवेकानंद पाटलांचा टोला!

गोकुळ संघर्ष मोर्चात विवेकानंद पाटलांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल. शासकीय संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून उपस्थित केले सवाल.

Nov 09, 2026
गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन! सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा विराट संघर्ष मोर्चा

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन! सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा विराट संघर्ष मोर्चा

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा. महायुतीच्या पाच तज्ज्ञ संचालक नियुक्तींविरोधात शेतकरी आक्रमक.

Nov 09, 2026
दिवाळीच्या सणात सावरखेडा गावावर शोककळा; ५८ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

दिवाळीच्या सणात सावरखेडा गावावर शोककळा; ५८ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

हिंगोलीच्या सावरखेड्यात ५८ वर्षीय शेतकरी कमळाजी लगड यांची आत्महत्या. कर्ज, नापिकी आणि मुलाच्या उपचारांचा खर्च यामुळे ते आर्थिक संकटात होते.

Nov 09, 2026