ठाकूरनगर गाव वाघ

ठाकूरनगर गावाजवळ वाघाचा वावर; वनविभागाकडून ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन

Thakurnagar Village Tiger: ठाकूरनगर परिसरात आज, मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजतापासून वाघ आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा वाघ गावाजवळच ठाण मांडून बसल्याची माहिती

ठाकूरनगर गावाजवळ वाघाचा वावर; वनविभागाकडून ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन

Thakurnagar Village Tiger

घोट (Thakurnagar Village Tiger) : ठाकूरनगर परिसरात आज, मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजतापासून वाघ आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा वाघ गावाजवळच ठाण मांडून बसल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच घोट वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक संजय राठोड तसेच वनरक्षक संतोष पवार, गणेश आखाडे, तोरे आणि सांगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आणि वाघापासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले. (Thakurnagar Village Tiger) वाघ गावाजवळ आढळून आल्याने नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये, एकट्याने शेतात किंवा जंगलाच्या दिशेने जाऊ नये, तसेच लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.