Tekadi Gurudwara Accident

टेकाडी गुरुद्वाराजवळ ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

टेकाडी गुरुद्वाराजवळ ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे जखमी. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह फरार, कन्हान पोलिसांत गुन्हा दाखल.

टेकाडी गुरुद्वाराजवळ ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Tekadi Gurudwara Accident

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक देऊन चालक वाहनासह पसार; कन्हान पोलिसांत गुन्हा दाखल

कन्हान : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर टेकाडी गुरुद्वाराजवळ शनिवारी (ता. ३१) पहाटे ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमन राजू जोसेफ (वय २८, रा. रामनगर, कन्हान) हा शनिवारी पहाटे आपल्या दोन मित्रांसह दुचाकीने नागपूर-जबलपूर महामार्गावरून टेकाडीच्या दिशेने जात होता. दुचाकी सौरभ पंजाबराव वासे चालवत होता. आशिष ऊर्फ गिज्जू कन्हैयालाल ठाकूर हा मधल्या सीटवर, तर अमन मागे बसला होता.

शनिवारी पहाटे सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास टेकाडी गुरुद्वाराजवळ मनसरकडून येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे रस्ता ओलांडत उजव्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दुचाकीची ट्रकच्या मागील उजव्या बाजूला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले.

धडकेमुळे सौरभ वासे याच्या गळ्याला, तर आशिष ठाकूर याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. अमनच्या डाव्या डोळ्याखालीही मार लागला. अपघातानंतर अमनने प्रसंगावधान राखत रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारचालकाला थांबवले. त्याच्या मोबाईलवरून १०० क्रमांकावर संपर्क साधत पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच आशिषच्या भावालाही अपघाताबाबत कळवले.

घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिघांनाही रुग्णवाहिकेतून नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी सौरभ वासे याला मृत घोषित केले. आशिष ठाकूर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून अमनलाही दुखापत झाली आहे.

या प्रकरणी अमन राजू जोसेफ याच्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३२, १३४ आणि १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लक्ष्मीकांत माणिकपुरी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. अपघातानंतर ट्रकसह पसार झालेल्या चालकाचा शोध घेणे हे पोलिसांसमोरील आव्हान आहे.

संबंधित सामग्री

अडाण नदीच्या पुलावर भीषण अपघात; दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू

अडाण नदीच्या पुलावर भीषण अपघात; दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू

नेरच्या अडाण नदी पुलावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; बानगावच्या ३५ वर्षीय अनिल जाधव यांचा जागीच मृत्यू.

Nov 14, 2026
भरधाव मालवाहू वाहनाची दोघांना जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर!

भरधाव मालवाहू वाहनाची दोघांना जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर!

मानोरा-मंगरूळपीर महामार्गावर मालवाहू वाहनाच्या धडकेत अजय चौधरी यांचा मृत्यू, तर प्रकाश लांडे गंभीर जखमी. अपघात २ नोव्हेंबर रोजी घडला.

Nov 03, 2026
कन्हान पोलिसांची धडक कारवाई; निर्दयीपणे कोंबलेल्या १० गोवंशांची सुटका

कन्हान पोलिसांची धडक कारवाई; निर्दयीपणे कोंबलेल्या १० गोवंशांची सुटका

Kanhan Police Action: मुक्या जनावरांची निर्दयीपणे वाहतुक कर णाऱ्यांविरुद्ध कन्हान पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करीत गोवंश तस्करीचा प्रयत्न उधळुन लावला. बोलेरो पिकअप वाहनातुन क्रूरपणे..

Nov 01, 2026
परभणीत कर्तव्यावरून घरी परतणाऱ्या होमगार्डचा अपघाती मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार

परभणीत कर्तव्यावरून घरी परतणाऱ्या होमगार्डचा अपघाती मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार

परभणीतील इसाद रोडवरील फुलमळा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत होमगार्ड दशरथ टोले आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू; होमगार्ड बालाजी गाडे जखमी.

Oct 17, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026