शिक्षक मतदारसंघ निवडणुक

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी ९१. ४७ टक्के मतदान

Teachers' Constituency Elections: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या  निवडणुकीत मानोरा  तालुक्यातील एकूण ३०५ पैकी २७९  शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्के ९१. ४७ टक्के आहे.

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी ९१. ४७ टक्के मतदान

Teachers' Constituency Elections

मानोरा येथे २७९ शिक्षकांनी बजावला मतदानाचा हक्क

मानोरा (Teachers' Constituency Elections) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या  निवडणुकीत मानोरा  तालुक्यातील एकूण ३०५ पैकी २७९  शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्के ९१. ४७ टक्के आहे. शुक्रवारी  २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत पार पडली.  एकूण २६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.  त्यामुळे मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याबाबत राजकीय व शैक्षणिक वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

विविध उमेदवारांकडून शिक्षक मतदारांपर्यंत (Teachers' Constituency Elections) पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात असून, आपल्या बाजूने मतदान व्हावे यासाठी प्रचारावर भर दिला. तालुक्यातील २१७ पुरुष, तर ६२ महीला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  शिक्षक मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, निवडणुकीसाठी  आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली होती.  मतदानासाठी येणाऱ्या शिक्षक मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदान केंद्राबाहेर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सर्वच उमेदवाराच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर बूथ टाकून शक्तिप्रदर्शन करत शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी नियोजन केले होते.