Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > जळगाव

Swing Accident

जळगाव मध्ये खेळता खेळता अनर्थ! घरातील झोपाळ्यावर खेळताना दुर्घटना; दीड वर्षांचा सार्थकने गमावला जीव

नशिराबाद येथील राजर्षी छत्रपती शिवाजीनगर नवीन प्लॉट परिसरात दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.


जळगाव मध्ये खेळता खेळता अनर्थ घरातील झोपाळ्यावर खेळताना दुर्घटना दीड वर्षांचा सार्थकने गमावला जीव

Swing Accident |

घरात खेळत असताना घडली दुर्घटना; सार्थक योगेश बन्हाटेच्या मृत्यूने बन्हाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

जळगाव : नशिराबाद येथील राजर्षी छत्रपती शिवाजीनगर नवीन प्लॉट परिसरात दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घरात झोपाळ्यावर खेळत असताना घडलेल्या या दुर्घटनेत सार्थक योगेश बन्हाटे याचा मृत्यू झाला. या घटनेने बन्हाटे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक घरातील झोपाळ्यावर खेळत होता. त्याची आई त्यावेळी घराबाहेर कपडे धुण्याचे काम करत होती. काही वेळाने ती घरात परतल्यानंतर सार्थक अडचणीत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्याला सोडवून उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, या दुर्घटनेत चिमुकल्याची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. अवघ्या दीड वर्षांच्या सार्थकच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.

सार्थक हा चार वर्षांच्या मोठ्या बहिणीचा लहान भाऊ होता. घरातील लहान आणि लाडका सदस्य अचानक गेल्याने आई-वडिलांसह त्याच्या बहिणीलाही मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती परिसरात समजताच नागरिकांनी बन्हाटे कुटुंबीयांच्या घरी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे नशिराबाद परिसरात शोककळा पसरली आहे.

Related to this topic: