पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प; ट्रक आणि कंटेनर अडकले, भाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ
कोगनोळी टोलनाक्यावर सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. आंदोलनाला जवळपास २४ तास उलटूनही पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत झालेली नाही. याचा परिणाम मालवाहतूक, एसटी बससेवा आणि भाजीपाला बाजारावर होत असून, कोल्हापुरात काही भाज्यांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे, कोल्हापूरहून बेळगावला जाणाऱ्या शंभरहून अधिक एसटी बस रद्द झाल्याने शेकडो प्रवाशांचे हाल होत आहेत.
महामार्गावर हजारो ट्रक आणि कंटेनर अडकले
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कोगनोळी टोलनाक्यावर बेमुदत महामार्ग रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. कोल्हापुरातील लक्ष्मी टेकडी आणि फाईव्ह स्टार एमआयडीसी परिसरात हजारो ट्रक व कंटेनर अडकून पडले आहेत.
Kolhapur, Maharashtra: Sugarcane farmers blocked the Pune-Bengaluru highway today at the Kognoli toll plaza on the Maharashtra-Karnataka border. Led by Raju Shetti, the Swabhimani Shetkari Sanghatana and Karnataka-based organisation Sakhar are demanding an MSP of ₹50 per kg for sugar, ₹70 per litre for ethanol, and a fair price for sugarcane. Heavy police deployment is in place on both sides of the Maharashtra-Karnataka border at the Kognoli toll plaza.
— IANS (@ians_india) October 13, 2026
या वाहनांमधून विविध राज्यांमध्ये मालाची वाहतूक केली जाते. मात्र, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने माल वेळेत पोहोचवण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. दीर्घकाळ वाहनांमध्ये अडकून राहिल्यामुळे ट्रकचालक आणि क्लीनर यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यातही त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
कोल्हापुरात भाजीपाल्याची आवक घटली; दरांमध्ये मोठी वाढ
महामार्ग रोको आंदोलनाचा परिणाम आता कोल्हापुरातील भाजीपाला बाजारातही दिसू लागला आहे. कोल्हापूरच्या बाजारात बेळगाव, गटप्रभा आणि आसपासच्या भागांतून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला दाखल होतो. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर भाजीपाला आणि इतर नाशवंत माल घेऊन जाणारे ट्रक अडकल्याने बाजारातील आवक कमी झाली आहे. परिणामी, किरकोळ आणि घाऊक बाजारात विविध भाज्यांच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.
भाजीपाल्याच्या दरांमध्ये झालेली वाढ पुढीलप्रमाणे आहे.
-
भेंडी: ८० रुपयांवरून १०० रुपये प्रति किलो
-
ढबू मिरची: ७० रुपयांवरून ८० रुपये प्रति किलो
-
गाजर: ६५ रुपयांवरून ८० रुपये प्रति किलो
-
वांगी: ८५ रुपयांवरून १०० रुपये प्रति किलो
-
वाटाणे: १८० रुपयांवरून २०० रुपये प्रति किलो
-
बीन्स: ९० रुपयांवरून १०० रुपये प्रति किलो
-
हिरवी मिरची: ७० रुपयांवरून ८० रुपये प्रति किलो
घाऊक बाजारातही दरवाढीचे चित्र कायम आहे. फुलकोबीचा दर २०० रुपयांवरून ३५० रुपये, तर कोबीचा दर ६० रुपयांवरून १०० रुपये झाला आहे. कोथिंबिरीच्या एका जुडीसाठी आता ३० रुपये मोजावे लागत असून, पूर्वी हा दर १५ रुपये होता. त्याचबरोबर १० किलो वांग्यांचा दर ५०० रुपयांवरून ६०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
Tension at Kognoli Toll Plaza: Heated Argument Between Raju Shetti’s Personal Assistant and #Karnataka Police — Dispute Over Allowing Vehicles to Pass Sparks Anger Among Protesters; Tense Atmosphere Prevails Briefly #Kolhapur/#Belagavi: A tense situation arose on Tuesday at the Kognoli toll plaza during an ongoing protest led by former MP Raju Shetti regarding issues concerning farmers from Maharashtra and Karnataka. A heated argument broke out between Swastik Patil—Personal Assistant to Raju Shetti—and the Karnataka Police over the issue of allowing vehicles to pass through the protest site. The dispute escalated quickly, leading to a verbal altercation between the protesters and the police. According to reports, while the protest was underway at the toll plaza, the Karnataka Police were allowing certain four-wheeled vehicles to pass. Swastik Patil questioned this action by the police, sparking a dispute between him and the officers. As the argument between the two parties intensified, protesters present at the scene also got involved, creating a tense atmosphere for a while. **Dispute Escalates During Dinner** It is reported that the incident occurred while a meal was being served to the farmers and protesters at the site. The dispute regarding the police allowing vehicles to pass caused resentment among the protesters, leading to another heated exchange between them and the police. The conflict between the police and protesters regarding vehicle movement during the agitation led by Raju Shetti created a sensitive situation at the toll plaza. However, according to available information, the tension persisted for some time; the situation later returned to normal. *Sugarcane farmers from both states along the Maharashtra-Karnataka border have launched an indefinite protest starting today, as they are not receiving a fair purchase price for their crops. Earlier today, protesters blocked the Pune-Bangalore National Highway. This agitation will continue tomorrow as well.*
— Siraj Noorani (@sirajnoorani) October 13, 2026
वाहतूक कोंडीमुळे भाजीपाल्याचा पुरवठा कमी झाल्याने ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात त्यामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर-बेळगाव एसटी बससेवा विस्कळीत
महामार्गावरील आंदोलनाचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेलाही बसला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या शंभरहून अधिक एसटी बस मंगळवारपासून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बेळगावला जाण्यासाठी कोल्हापूर एसटी स्थानकात आलेल्या शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
कामानिमित्त, प्रवासासाठी तसेच अन्य कारणांसाठी बेळगावला जाणाऱ्या प्रवाशांना बससेवा बंद असल्याने स्थानकातच थांबावे लागत आहे. बेळगावच्या दिशेने एकही बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे आंतरराज्य वाहतूक विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीपासून जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यापर्यंत विविध क्षेत्रांवर होत आहे. बससेवा बंद असल्यामुळे निर्माण झालेली प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी प्रशासनाने पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.