गोल्डन स्ट्रिंग्स म्युझिकल ग्रुपतर्फे 4 नोव्हेंबरला विशेष संगीत कार्यक्रम
नागपूर (Superhits of Black and White Era) : जुन्या हिंदी चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ पुन्हा अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. गोल्डन स्ट्रिंग्स म्युझिकल ग्रुपतर्फे ‘सुपरहिट्स ऑफ ब्लॅक अँड व्हाइट एरा’ या विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, 4 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 5:45 वाजल्यापासून लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक हॉल, 8-रस्ता चौक येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.
जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गाणी, मधुर संगीत आणि अविस्मरणीय सुरांची अनुभूती या कार्यक्रमातून रसिकांना घेता येणार आहे. काळाच्या ओघातही लोकप्रियता टिकवून असलेल्या सदाबहार गीतांची सुरेल मेजवानी संगीतप्रेमींसाठी सज्ज झाली आहे.
या (Superhits of Black and White Era) कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन अमित अंधारे यांनी केले असून, सूत्रसंचालन धनश्री सेवलकर करणार आहेत. प्रमुख गायक गिरीश बडे, आनंद गायधनी आणि धीरज पारपल्लीवार, तर ज्योती बनकर, मनश्री जोशी, निलिमा उराडे आणि साक्षी त्यागी या गायिका आपल्या सुमधुर आवाजात रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी महेंद्र ढोले आणि टीम यांचे संगीत संयोजन असणार आहे. तसेच स्टेज व्यवस्थापन राजेश अमीन, प्रकाश व्यवस्था गुलशन आणि ध्वनी व्यवस्था ऋषभ ढोमने सांभाळणार आहेत. या संगीतमय सोहळ्याचे प्रायोजक म्हणून कूल मेकर्स, रचना कन्स्ट्रक्शन कंपनी, मेगास्पॅन इन्फ्रा व्हेंचर्स आणि JIC यांचे सहकार्य लाभले आहे.
जुन्या हिंदी चित्रपटसंगीताचा ठेवा पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी नागपूरकर संगीतप्रेमींनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन गोल्डन स्ट्रिंग्स म्युझिकल ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.