Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली साखरे साठेबाजी

साखरेच्या साठेबाजीवर हिंगोली जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले जाणार

Hingoli Sugar Hoarding: साखरेच्या वाढत्या किंमती आणि काळाबाजाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने साखरेवर साठा नियंत्रण लागू केल्यानंतर आता राज्य सरकारने...


साखरेच्या साठेबाजीवर हिंगोली जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले जाणार

Hingoli Sugar Hoarding |

 

साठे बाजारीवर घातला जाणार अंकुश

हिंगोली (Hingoli Sugar Hoarding) : साखरेच्या वाढत्या किंमती आणि काळाबाजाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने साखरेवर साठा नियंत्रण लागू केल्यानंतर आता राज्य सरकारने देखील राज्यभरात साखरेचा साठा, विक्री आणि वाहतुकीची काटेकोर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबविण्याच्यास सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातही साठेबाजारीवर अंकुश घालण्याकरीता धाडसत्र सुरू होणार आहे.

केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साठा निर्बंध लागू असणार आहेत. त्यानुसार शासकीय संस्था आणि सार्वजनिक वितरण प्रणाली वगळता इतर कोणताही साखर विक्रेता किंवा वितरक कोणत्याही एका ठिकाणी ४ हजार क्विंटल म्हणजेच ४०० मे. टनापेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवू शकणार नाही. तसेच (Hingoli Sugar Hoarding) साखर प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांपेक्षा जास्त काळ तो साठा आपल्याकडे ठेवता येणार नाही. त्याचबरोबर ज्या मोठ्या ग्राहकांचा उत्पादनासाठी किंवा कच्चा माल म्हणून महिन्याला १० मे. टनापेक्षा जास्त साखरेचा वापर आहे, अशा कंपन्यांना साठा मिळाल्यापासून १५ दिवसांपेक्षा जास्त काळ साठा करता येणार नाही.  

या निर्णयाच्या अंमलबजावणी साठी सर्व साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांना केंद्राच्या फूड स्टॉक मॉनिटरिंग पोर्टलवर तात्काळ नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून दर शुक्रवारी आपल्याकडील साठ्याची अद्ययावत माहिती पोर्टलवर भरावी लागणार आहे. नोंदणी न केल्यास किंवा चुकीची माहिती भरल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कठोर कारवाईचा इशारा शासनाने दिला आहे. 

साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात सहकारी संस्था, साखर आयुक्त कार्यालय, वैधमापन शास्त्र आणि पोलीस विभागाचे अधिकारी असतील. हे पथक थेट व्यापार्‍यांच्या गोदामांना भेट देऊन साखरेच्या पोत्यांची प्रत्यक्ष मोजणी करणार असून खरेदी पावत्या, गेट पास आणि वाहतूक कागदपत्रांची तपासणी करणार आहे.  तपासणीत तफावत आढळल्यास साठ्याचे फोटो आणि कागदपत्रांसह अहवाल शासनाला सादर केला जाणार असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

Related to this topic: