उपविभागीय अधिकारी शरद पाटील

उपविभागीय अधिकारी शरद पाटील  शेतकऱ्यांच्या बांधावर..

Sub-Divisional Officer Sharad Patil: बुलढाणा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी साकेगाव येथे भेट देऊन महसूल विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला.

उपविभागीय अधिकारी शरद पाटील  शेतकऱ्यांच्या बांधावर..

Sub-Divisional Officer Sharad Patil

साकेगाव येथे उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांची भेट;
विविध कामांची पाहणी शेतकरी नोंदणी शिबिराचा आढावा; पाणीटंचाई टाळण्यासाठी खबरदारीच्या सूचना

चिखली (Sub-Divisional Officer Sharad Patil) : बुलढाणा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी साकेगाव येथे भेट देऊन महसूल विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील शेतकरी नोंदणी शिबिर, पाझर तलाव, शेतरस्ते आणि प्राचीन महादेव मंदिराची प्रत्यक्ष पाहणी केली.

साकेगाव ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणी व ई-केवायसी शिबिर सुरू आहे. या शिबिराला उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी व ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शिबिरातील कामकाजाचा आढावा घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी मंडळ अधिकारी संजय चौधरी यांनी प्रास्ताविक केले, तर ग्राम महसूल अधिकारी प्रियंका खरात यांनी आभार मानले.

यानंतर त्यांनी साकेगाव येथील पाझर तलावाची पाहणी केली. आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. गावात पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थांनी आतापासूनच आवश्यक खबरदारी घ्यावी आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी अशोक इंगळे व अंबादास इंगळे यांच्या शेतरस्त्यांचीही त्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी केली. साकेगाव-माळशेंबा शेतरस्त्याच्या प्रश्नाबाबत दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी आपापसांत समन्वय साधून सर्वसंमतीने रस्ता तयार करावा. त्यानंतर हा रस्ता बळीराजा पांदण रस्ता योजनेअंतर्गत घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने परस्पर सहकार्याने प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, साकेगाव येथील पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील प्राचीन व ऐतिहासिक महादेव मंदिरालाही त्यांनी धावती भेट दिली. या पाहणी दौऱ्याप्रसंगी मंडळ अधिकारी संजय चौधरी, उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक गोरे, ग्राम महसूल अधिकारी प्रियंका खरात, महसूल सेवक स्नेहल पारवे, उपसरपंच देवीदास लोखंडे, पोलीस पाटील सुनील निकाळजे, अंबादास तायडे, ई-सेवा केंद्र चालक शेख अस्लम यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात 12 परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

महाराष्ट्रात 12 परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Maharashtra IPS Appointment: महाराष्ट्र गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील 12 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या पदस्थापना जाहीर केल्या आहेत. याबाबतचा शासन आदेश 25 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात

Aug 26, 2026