अकोला रुग्णालयातील स्ट्रेचर न मिळाल्याचा गंभीर आरोप;पतीला पाठीवर घेऊन फिरणाऱ्या महिलेने मांडली व्यथा

जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील एका व्हायरल व्हिडिओमुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकोला रुग्णालयातील स्ट्रेचर न मिळाल्याचा गंभीर आरोप;पतीला पाठीवर घेऊन फिरणाऱ्या महिलेने मांडली व्यथा

Stretcher Unavailable

अकोला (Stretcher Unavailable) : जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील एका व्हायरल व्हिडिओमुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ब्रेन स्ट्रोकग्रस्त पतीला उपचारासाठी रुग्णालयात आणल्यानंतर स्ट्रेचर उपलब्ध न झाल्याने पत्नी माधुरी हरिजन यांनी पती संजय हरिजन यांना पाठीवर घेऊन रुग्णालय परिसरात मदतीसाठी धावपळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

या प्रकरणानंतर प्रथमच माध्यमांशी संवाद साधताना माधुरी हरिजन यांनी त्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमाबाबत गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पतीला उपचारासाठी रुग्णालयात आणल्यानंतर अनेकदा विनंती करूनही स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने त्यांनी स्वतः पतीला पाठीवर उचलून उपचारासाठी विविध विभागांत नेण्याचा प्रयत्न केला.

मूर्तिजापूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या हरिजन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्याचे सांगितले जाते. कुटुंबात चार अपत्ये असून उपजीविकेची मोठी कसरत करावी लागते. काही वर्षांपूर्वी झाडावरून पडल्याने संजय हरिजन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात आले होते. मात्र प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले होते. याचवेळी स्ट्रेचरच्या अभावामुळे हा संपूर्ण प्रकार घडल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि राजकीय पातळीवर या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या निर्देशानंतर संबंधित दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

या प्रकरणानंतर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी हरिजन कुटुंबाचा शोध घेत त्यांना मदतीचा हात दिला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे संजय हरिजन यांना अखेर अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

सध्या तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. या घटनेमुळे शासकीय रुग्णालयांतील मूलभूत सुविधा, रुग्णसेवेची गुणवत्ता आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेबाबत पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित सामग्री

 धावत्या लोकलसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

धावत्या लोकलसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

विक्रोळी रेल्वे स्थानकात धावत्या लोकलसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न! अनोळखी प्रवाशाने प्रसंगावधान दाखवत वाचवले प्राण; VIDEO व्हायरल.

Nov 07, 2026
बंगळुरूत सोन्याच्या चेनसाठी तरुणीचा गळा धरला! भरबाजारातील थरारक व्हिडीओ व्हायरल

बंगळुरूत सोन्याच्या चेनसाठी तरुणीचा गळा धरला! भरबाजारातील थरारक व्हिडीओ व्हायरल

बंगळुरूत सोन्याच्या चेनसाठी तरुणीचा गळा पकडला! घटनेचा व्हिडीओ व्हायरल; आरोपी प्रभू राजला अटक.

Nov 03, 2026
तुळजाभवानी मंदिर परिसरात तुफान राडा! सेवेकरी आणि पुजाऱ्यात तुंबळ हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

तुळजाभवानी मंदिर परिसरात तुफान राडा! सेवेकरी आणि पुजाऱ्यात तुंबळ हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

तुळजाभवानी मंदिरात सिमोल्लंघन उत्सवादरम्यान सेवेकरी आणि पुजाऱ्यात हाणामारी झाली. अहिल्यानगरचा सेवेकरी जखमी; घटनेचा व्हिडीओ व्हायरल.

Oct 21, 2026
‘तक्रार करायची तिथे कर’ म्हणणे पडले महागात; ठाण्यात ५ रुपयांच्या एक्सपायर  बिस्किटावरून FDA ने ठोकले दुकानाला टाळे

‘तक्रार करायची तिथे कर’ म्हणणे पडले महागात; ठाण्यात ५ रुपयांच्या एक्सपायर बिस्किटावरून FDA ने ठोकले दुकानाला टाळे

ठाण्यात ५ रुपयांच्या मुदतबाह्य बिस्किटावरून वाद. राघव दुबे यांच्या तक्रारीनंतर FDA ने रामायण जनरल स्टोअरवर कारवाई करत दुकानाला टाळे ठोकले.

Oct 17, 2026
फराह खानने कपाळावर टिळा लावण्यास दिला नकार? व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर ट्रोलिंग

फराह खानने कपाळावर टिळा लावण्यास दिला नकार? व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर ट्रोलिंग

फराह खानचा हॉटेलमधील स्वागताचा व्हिडीओ व्हायरल; कपाळावर टिळा लावण्यास नकार दिल्याच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर चर्चा आणि ट्रोलिंग.

Oct 17, 2026