एसटी NCMC कार्ड

महिला लाभार्थींना दिलासा; महिलांच्या एसटी प्रवास सवलतीसाठी NCMC कार्डची अट ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल

ST NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) वतीने महिला प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड संदर्भात महत्त्वाचा निर्णय..

महिला लाभार्थींना दिलासा; महिलांच्या एसटी प्रवास सवलतीसाठी NCMC कार्डची अट ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल

ST NCMC Card

 

ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे घेण्याचे निर्देश!

NCMC कार्ड नोंदणी व वितरणासाठी महामंडळाचे विशेष अभियान

अहमदपूर (ST NCMC Card) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) वतीने महिला प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना एसटी महामंडळाच्या विविध प्रवास सवलतींचा लाभ घेण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील महिला लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी व वितरण अपेक्षित प्रमाणात झाले नसल्याने या अटीला १ नोव्हेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.

महामंडळाच्या वाहतूक विभागाकडून यासंदर्भात प्रादेशिक व्यवस्थापक, विभाग नियंत्रक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता अद्याप केवळ १.१० कोटी NCMC कार्डांची नोंदणी व वितरण झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचलेली नसल्याने कार्ड नोंदणीचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत NCMC कार्ड अनिवार्यतेची अट शिथिल करण्यात आली आहे.

दरम्यान, कार्ड नोंदणी (ST NCMC Card) व वितरणाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या शिबिरांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या विशेष अभियानाच्या माध्यमातून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत १०० टक्के NCMC कार्ड नोंदणी व वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
   
सदरील कार्ड काढण्यासाठी 199 रुपये खर्च येणार आहे. जर कोणी जास्तीचा खर्च मागितला तर आगार प्रमुख यांच्याशी त्या व्यक्तीची तक्रार करण्यात यावे असेही सांगण्यात आले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्ड नोंदणीसाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे महिला लाभार्थ्यांनी या मुदतीत आपले NCMC कार्ड नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन नरसिंग निमणवाड आगार प्रमुख अहमदपूर,चांद देशमुख स्थानक प्रमुख अहमदपूर यांनी केली आहे.

टैग्स: ST NCMC Card

संबंधित सामग्री

महिला आणि ज्येष्ठांच्या एसटी सवलतीसाठी NCMC कार्डची सक्ती अखेर लांबणीवर

महिला आणि ज्येष्ठांच्या एसटी सवलतीसाठी NCMC कार्डची सक्ती अखेर लांबणीवर

ST NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकला आहे. यापूर्वी १ सप्टेंबर २०२६ पासून NCMC कार्ड

Sep 02, 2026
एसटीचे संपूर्ण भाडे भरून लाडकी बहीण सासरी!

एसटीचे संपूर्ण भाडे भरून लाडकी बहीण सासरी!

ST NCMC Card: महामंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. यात महिला व वृद्धांना प्रवासाची सवलत हवी असेल तर 'एन सी एम सी' कार्ड असणे अनिवार्य आहे. जर हे कार्ड नसेल तर बसच्या प्रवासामध्ये मिळणारी सवलत

Sep 01, 2026
एस.टी.च्या एनसीएमसी कार्डला 'तांत्रिक अडचणीं'चा ब्रेक; प्रवासी संघटनांचा विरोध

एस.टी.च्या एनसीएमसी कार्डला 'तांत्रिक अडचणीं'चा ब्रेक; प्रवासी संघटनांचा विरोध

ST NCMC Card: एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी (NCMC) कार्ड प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली असली, तरी ग्रामीण भागात या प्रणालीला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना

Sep 01, 2026
उद्या १ सप्टेंबर पासून NCMC कार्ड अनिवार्य, एसटी महामंडळाचे आदेश जारी

उद्या १ सप्टेंबर पासून NCMC कार्ड अनिवार्य, एसटी महामंडळाचे आदेश जारी

ST NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतीच्या प्रवासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दि. १ सप्टेंबर २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना सवलत

Aug 31, 2026