Somthana Triple Murder

सोमठाण्यात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; चिखली तालुका हादरला!

सोमठाण्यात शेतीच्या वादातून आई, भाऊ आणि पुतण्याची हत्या. आरोपी दीपक सुरडकर फरार असून, चिखली पोलिसांकडून व्यापक शोधमोहीम सुरू.

सोमठाण्यात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; चिखली तालुका हादरला!

Somthana Triple Murder

आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याची धारदार शस्त्राने हत्या; आरोपी दीपक सुरडकर फरार, पोलिसांकडून व्यापक शोधमोहीम

चिखली : चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे कौटुंबिक शेतीच्या वादातून जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या तिहेरी हत्याकांडामुळे सोमठाणा परिसरासह संपूर्ण चिखली तालुका हादरला आहे. या प्रकरणात दीपक फत्तेसिंह सुरडकर याच्यावर तिघांच्या हत्येचा आरोप असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे.

या घटनेत आई सरस्वतीबाई फत्तेसिंह सुरडकर (वय ७०), भाऊ संजय फत्तेसिंह सुरडकर (वय ५५) आणि पुतण्या रणजीत संजय सुरडकर (वय २५) यांचा मृत्यू झाला.

शेतीच्या वाटणीवरून सुरू होता वाद

मिळालेल्या माहितीनुसार, फत्तेसिंह सुरडकर यांना तीन मुले आहेत. त्यापैकी संजय सुरडकर हे शेलूद येथे, तर दीपक आणि तिसरा भाऊ अजय हे सोमठाणा येथे राहतात. कौटुंबिक शेतीच्या वाटणीवरून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तीव्र वाद सुरू होता.

दोन दिवसांपूर्वी संजय सुरडकर यांनी पत्नी आणि मुलासह शेतातील सोयाबीन सोंगणीचे काम सुरू केले होते. घटनेच्या दिवशी, ८ ऑक्टोबर रोजीही ते शेतात कामासाठी गेले होते.

सायंकाळी काम आटोपून परतत असताना संजय सुरडकर यांच्या मोटारसायकलची वायर तोडण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे संजय आणि त्यांचा मुलगा रणजीत हे दोघे मोटारसायकल ढकलत गावाकडे येत होते. गावाच्या रस्त्यावर, आरोपी दीपक सुरडकर याच्या घरासमोरच त्याने दोघांना गाठले आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला.

घरात घुसून वृद्ध आईचीही हत्या

भाऊ आणि पुतण्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी दीपक याने घरात प्रवेश केला. घरात खाटेवर बसलेल्या ७० वर्षीय आई सरस्वतीबाई सुरडकर यांच्यावरही त्याने धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यात त्यांचाही मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, दीपकच्या हिश्श्याची शेती आईने भाऊ संजय याच्या नावावर केल्याच्या रागातून हे हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा नेमका घटनाक्रम आणि हत्येमागील कारणांचा तपास पोलीस करत आहेत.

शेलूद येथे पोलीस बंदोबस्त; रात्रभर शोधमोहीम

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलेश तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

तिघांच्या हत्येनंतर आरोपी दीपक याने संजय सुरडकर यांच्या शेलूद येथील घराकडेही धाव घेतल्याची चर्चा परिसरात होती. त्यामुळे पोलिसांनी शेलूद येथील घराला कडेकोट बंदोबस्त दिला. पोलिसांचा पहारा पाहून आरोपी तेथून पसार झाल्याचे सांगितले जाते.

पोलिसांनी घटनास्थळ प्रतिबंधित करून तज्ज्ञांच्या उपस्थितीत उशिरापर्यंत पंचनामा केला. त्यानंतर तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

सुरडकर कुटुंबाची गुन्हेगारी आणि अपघाती पार्श्वभूमी

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरडकर कुटुंबातील यापूर्वीच्या घटनांचाही उल्लेख केला जात आहे. आरोपी दीपकचा भाऊ अजय सुरडकर याने काही महिन्यांपूर्वी सोमठाणा येथील वैभव वाघमारे या दिव्यांग व्यक्तीला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अजय सध्या तुरुंगात असल्याचे सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी अजयच्या मुलाचाही चिखली येथे अपघातात मृत्यू झाला होता.

विशेष म्हणजे, या हत्याकांडात मृत्यू झालेला २५ वर्षीय रणजीत सुरडकर हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. आरोपी दीपकचा मुलगाही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याची माहिती आहे.

फरार आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध

तिहेरी हत्याकांडानंतर फरार झालेल्या दीपक सुरडकर याचा शोध घेण्यासाठी चिखली पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे सोमठाणा गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

संबंधित सामग्री

विद्यार्थी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; वर्षभरात 1,909 आत्महत्यांची नोंद

विद्यार्थी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; वर्षभरात 1,909 आत्महत्यांची नोंद

Maharashtra Student Suicides: देशातील विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) 2024 च्या अहवालातील आकडेवारीवरून समोर आल

Nov 12, 2026
नाकाबंदीत पोलिसाला कारने २०० मीटर फरफटले! कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी; थरारक CCTV व्हिडीओ समोर

नाकाबंदीत पोलिसाला कारने २०० मीटर फरफटले! कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी; थरारक CCTV व्हिडीओ समोर

कळंबोलीत नाकाबंदीदरम्यान पोलिस कॉन्स्टेबलला कारने २०० मीटर फरफटले. दिलीप भोई गंभीर जखमी; बनावट नंबर प्लेट असलेल्या कारमधील आरोपींचा शोध सुरू.

Nov 11, 2026
पुण्यात गाडीला कट मारल्याचा वाद जीवावर बेतला! शिवमवर कोयत्याने हल्ला, शरीरावर ७०० टाके

पुण्यात गाडीला कट मारल्याचा वाद जीवावर बेतला! शिवमवर कोयत्याने हल्ला, शरीरावर ७०० टाके

राजगुरुनगरमध्ये गाडीला कट मारल्याच्या वादातून तीन अल्पवयीन मुलांचा शिवम करमारेवर कोयत्याने हल्ला. तीन बोटे तुटली, शरीरावर ७०० टाके.

Nov 11, 2026
नागपुरात शिक्षक दाम्पत्याची आत्महत्या; दिवाळीसाठी आलेल्या पती-पत्नीचा घरात आढळला मृतदेह

नागपुरात शिक्षक दाम्पत्याची आत्महत्या; दिवाळीसाठी आलेल्या पती-पत्नीचा घरात आढळला मृतदेह

नागपुरातील रेवतीनगर येथे शिक्षक दाम्पत्य मनीष आणि सोनाली गणवीर यांचे मृतदेह आढळले. बेलतरोडी पोलिसांकडून तपास सुरू.

Nov 10, 2026
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर बँक निवडणुकीदरम्यान कमलाकर शिंदे बेपत्ता; मुलगी सृष्टी यांचा अरविंद पाटलांवर अपहरणाचा गंभीर आरोप.

Nov 09, 2026