सोमठाणा तिहेरी हत्याकांड

सोमठाण्यात तिहेरी हत्याकांड; चिखली तालुका हादरला!

Somthana Triple Murder Case: तालुक्यातील सोमठाणा येथे धक्कादायक तिहेरी हत्याकांड घडले आहे. जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याची हत्या करून आरोपी दीपक फत्तेसिंह सुरडकर फरार झाला आहे.

सोमठाण्यात तिहेरी हत्याकांड; चिखली तालुका हादरला!

Somthana Triple Murder Case

 

आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याची धारधार  चाकूने हत्या करून आरोपी दीपक सुरडकर फरार!

चिखली (Somthana Triple Murder Case) : तालुक्यातील सोमठाणा येथे धक्कादायक तिहेरी हत्याकांड घडले आहे. जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याची हत्या करून आरोपी दीपक फत्तेसिंह सुरडकर फरार झाला आहे. या हत्याकांडात आई सरस्वती फतेसिंग सुरडकर, वय ७० वर्षे; भाऊ संजय फत्तेसिंह सुरडकर, वय ५५ वर्षे; आणि पुतण्या रणजीत संजय सुरडकर, वय २५ वर्षे, यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याचा जीव घेणाऱ्या या घटनेने सोमठाणा हादरले आहे. (Somthana Triple Murder Case) एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या झाली असून, आरोपी दीपक सुरडकर घटनेनंतर फरार झाला आहे. ७० वर्षीय सरस्वती फतेसिंग सुरडकर, त्यांचा ५५ वर्षीय मुलगा संजय फत्तेसिंह सुरडकर आणि २५ वर्षीय नातू रणजीत संजय सुरडकर हे या हत्याकांडाचे बळी ठरले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, दीपकच्या हिश्यातली शेती आईने त्याच्या भावाच्या नावावर केल्याच्या रागातून हे (Somthana Triple Murder Case) हत्याकांड घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रम पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे

संबंधित सामग्री

सोमठाणा तिहेरी हत्याकांड: आरोपी दीपक सुरडकर व जगदीश सुरडकर दोघांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

सोमठाणा तिहेरी हत्याकांड: आरोपी दीपक सुरडकर व जगदीश सुरडकर दोघांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

Somthana Triple Murder Case: या प्रकरणातील दुसरा आरोपी जगदीश दीपक सुरडकर हादेखील अटकेत असून, आता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Oct 11, 2026