Sion Hospital

सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरचा मृत्यू; वसतिगृहातील बाथरूममध्ये आढळला मृतदेह

मुंबईच्या सायन रुग्णालयात निवासी डॉक्टर शिवचरण आप्पा पाटील यांचा मृत्यू. ॲनस्थेशियाच्या औषधांचा ओव्हरडोस घेतल्याचा प्राथमिक अंदाज; पोलीस तपास सुरू.

सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरचा मृत्यू; वसतिगृहातील बाथरूममध्ये आढळला मृतदेह

शिवचरण आप्पा पाटील हे सर्जरी विभागात पदव्युत्तर प्रथम वर्षाचे विद्यार्थी; ॲनस्थेशियाच्या औषधांचा ओव्हरडोस घेतल्याचा प्राथमिक अंदाज, घटनेचा तपास सुरू

मुंबईतील सायन रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात एका डॉक्टरचा मृतदेह आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शिवचरण आप्पा पाटील असे मृत डॉक्टरचे नाव असून, शनिवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांनी ॲनस्थेशियाच्या औषधांचा ओव्हरडोस घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

शिवचरण पाटील हे सायन रुग्णालयाच्या सर्जरी विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. ते रुग्णालयाच्या पीजी वसतिगृहात राहत होते. शनिवारी ते कामासाठी वॉर्डमध्ये आले नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

मोबाईलचा आवाज बाथरूममधून आल्याने संशय

शिवचरण पाटील रुग्णालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या रूम पार्टनरला खोलीत जाऊन पाहण्यास सांगण्यात आले. त्यानुसार, त्यांचा सहकारी खोलीत पोहोचला; मात्र शिवचरण तेथे दिसले नाहीत. त्यांना फोन लावल्यानंतर मोबाईलचा आवाज बाथरूममधून ऐकू आला. यामुळे सहकाऱ्याला संशय आला आणि त्याने ही बाब इतरांच्या निदर्शनास आणून दिली.

यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी खोलीतील बाथरूमचा दरवाजा उघडला असता शिवचरण पाटील मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या हाताला आयव्ही सलाईन लावलेले होते. तसेच, बाथरूममधील कमोडमध्ये ॲनस्थेशियाच्या औषधांच्या दोन बाटल्या सापडल्या. या परिस्थितीवरून त्यांनी औषधे स्वतःच्या शरीरात इंजेक्ट केली असावीत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे

या प्रकरणात एडीआर रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांनी दिली. शवविच्छेदन सायन रुग्णालयात करायचे की अन्य ठिकाणी, याबाबत मृत डॉक्टरांच्या नातेवाईकांना पर्याय देण्यात आला आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल.

शिवचरण पाटील यांच्या निधनामुळे एक होतकरू भावी सर्जन गमावल्याची भावना अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांनी व्यक्त केली. या घटनेमागील कारण पोलीस तपासातून स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी

या घटनेची रुग्णालय प्रशासनाकडून अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांशी नियमित संपर्क ठेवला जात असतानाही अशी घटना घडल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांना मानसिक बळ देण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील, असे अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिवचरण पाटील यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबी पोलीस तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

 धावत्या लोकलसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

धावत्या लोकलसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

विक्रोळी रेल्वे स्थानकात धावत्या लोकलसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न! अनोळखी प्रवाशाने प्रसंगावधान दाखवत वाचवले प्राण; VIDEO व्हायरल.

Nov 07, 2026
बेंगळुरूत भीषण हत्याकांड! पत्नी, सासूसह सासरच्या सात जणांची हत्या; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

बेंगळुरूत भीषण हत्याकांड! पत्नी, सासूसह सासरच्या सात जणांची हत्या; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

बेंगळुरूत कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासरच्या सात जणांची हत्या; सात वर्षांच्या मुलाचाही समावेश. आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात.

Nov 06, 2026
दिवाळीपूर्वी FDA ची धडक मोहीम; 9 कोटींचा अन्नसाठा जप्त

दिवाळीपूर्वी FDA ची धडक मोहीम; 9 कोटींचा अन्नसाठा जप्त

Food and Drug Administration: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमधील भेसळ, अवैध साठवणूक आणि निकृष्ट खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात विशेष मोहीम...

Nov 04, 2026
समृद्धी महामार्गावर शासकीय अभियंत्याचे अपहरण करून लूट

समृद्धी महामार्गावर शासकीय अभियंत्याचे अपहरण करून लूट

समृद्धी महामार्गावर शासकीय अभियंत्याचे अपहरण करून लूट! माजी चालकांसह पाच आरोपींना २४ तासांत अटक; न्यायालयाकडून पाच दिवसांची कोठडी.

Nov 04, 2026
आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगकडून धमकी? कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा ऑडिओ मेसेज, पोलिसांकडून तपास सुरू

आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगकडून धमकी? कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा ऑडिओ मेसेज, पोलिसांकडून तपास सुरू

आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगच्या नावाने धमकीचा ऑडिओ मेसेज? कोट्यवधींच्या मागणीचा दावा; पोलिसांकडून आवाजाची पडताळणी सुरू.

Nov 04, 2026