श्री कुल स्वामिनी नवदुर्गा महोत्सव

हिंगोलीत फटाक्याच्या दुर्घटनेतील मृतकांच्या कुटूबांना प्रत्येकी ५० हजाराची आर्थिक मदत

Shree Kul Swamini Navadurga Festival: शहरभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक भान जपणारे उपक्रमही राबवले जात आहेत.

हिंगोलीत फटाक्याच्या दुर्घटनेतील मृतकांच्या कुटूबांना प्रत्येकी ५० हजाराची आर्थिक मदत

Shree Kul Swamini Navadurga Festival

 

हिंगोलीतील श्री कुल स्वामिनी नवदुर्गा महोत्सव समितीचा स्तुत्य उपक्रम
आर्ची' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या उपस्थितीत रंगला दांडिया महोत्सव; राम कदम यांची घोषणा

हिंगोली (Shree Kul Swamini Navadurga Festival) : शहरभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक भान जपणारे उपक्रमही राबवले जात आहेत. हिंगोली शहरातील हनुमान नगर येथे बसविण्यात आलेल्या 'श्री कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव समिती'च्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान समितीच्या वतीने सामाजिक दायित्व जपत हिंगोलीत नुकत्याच झालेल्या भीषण फटाका दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.

या दांडिया महोत्सवाला १४ ऑक्टोबर रोजी 'सैराट' चित्रपटफेम प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) हिने विशेष हजेरी लावली होती. तिची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या भव्य सोहळ्याचे नेटके नियोजन नगरसेवक श्याम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. युवा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. हिंगोली शहरात घडलेल्या दुर्दैवी फटाका दुर्घटनेत (अग्नीकांड) ज्या चार नागरिकांचा अकाली मृत्यू झाला, त्यांच्या दुःखात सहभागी होत श्री कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव समितीच्या वतीने पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

याप्रसंगी नगरसेवक श्याम कदम, माजी नगरसेवक बाबू कदम यांच्यासह शहरातील अनेक प्रमुख राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, समितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सव साजरा करतानाच पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या या उपक्रमाचे हिंगोली शहरातून विशेष कौतुक होत आहे.