Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हेमाडपंथी महादेव मंदिर

वैजापूर येथील हेमाडपंथी महादेव मंदिरात श्रावणी सोमवारी महादेव पिंडीवर नागराज अवतरले..

Hemadpanthi Mahadev Temple: सकाळच्या सुमारास भल्ला मोठा नागराज अवतरल्याने तेथील भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. नागराजांनी महादेवाच्या पिंडी प्रदक्षिणा घालून भाविक भक्तांना याचे दर्शन घडविले


वैजापूर येथील हेमाडपंथी महादेव मंदिरात श्रावणी सोमवारी महादेव पिंडीवर नागराज अवतरले

Hemadpanthi Mahadev Temple |

 

अनेक शिवभक्तांनी घेतले नागराजाचे दर्शन 

हिंगोली (Hemadpanthi Mahadev Temple) : तालुक्यातील वैजापूर येथे हेमाडपंथी महादेव मंदिर असून हे मंदिर 200 वर्षांपूर्वीचे आहे. या महादेव मंदिरात वैजापूर पंचक्रोशीतील शिवभक्त हे दर्शनासाठी नेहमीच येत असतात. परंतु दुसऱ्या श्रावणी  सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास भल्ला मोठा नागराज अवतरल्याने तेथील भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. नागराजांनी महादेवाच्या पिंडी प्रदक्षिणा घालून भाविक भक्तांना याचे दर्शन घडविले.

वैजापूर हे संत श्री नामदेव महाराजांच्या नरसी नामदेव गावाजवळ वसलेले गाव आहे. या वैजापूर गावात मागील दोनशे वर्षांपूर्वी महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात महादेवाची पिंड मागील दोनशे वर्षांपूर्वी स्थापित झालेली आहे. या मंदिरात दर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिक महिलाही नेहमीच येत असतात श्रावण सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास भल्ला मोठा नागराज अवतरला होता. (Hemadpanthi Mahadev Temple) नागराजांनी महादेवाच्या पिंडी समोर अनेक प्रदर्शना घातल्या त्यानंतर नागराजांनी अनेक भाविक भक्तांना दर्शन ही दिले. मात्र काही नागरिकांना भीती वाटत असल्यामुळे सर्प मित्राला बोलून त्या नागराजाला पकडत एका पाण्याच्या तळ्यामध्ये जिवंतपणी सोडून देण्यात आले.