शिवसेना पाणीपुरवठा आंदोलन

पाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा जलसमाधीचा इशारा 

Shiv Sena Water Supply Protest: लातूर तालुक्यातील चिंचोली ब. या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावाचा रायगव्हाण येथून शिराळा पाचखेडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा गेल्या सात वर्षांपासून बंद..

पाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा जलसमाधीचा इशारा 

Shiv Sena Water Supply Protest


शिवसेना तालुकाप्रमुखांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
थकीत वीजबिलाच्या व्याजापोटी पाणीपुरवठा बंद!

लातूर (Shiv Sena Water Supply Protest) : लातूर तालुक्यातील चिंचोली ब. या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावाचा रायगव्हाण येथून शिराळा पाचखेडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा गेल्या सात वर्षांपासून बंद आहे. विशेष म्हणजे, संबंधित योजनेचे थकीत वीजबिल भरूनही केवळ व्याजाच्या रकमेपोटी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. एकीकडे जलसाठ्यात मार्च-एप्रिलअखेर पुरेल इतके पाणी उपलब्ध असतानाही दुसरीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन रायगव्हाण येथून चिंचोली ब. गावाचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य राजकुमार सुरवसे यांनी केली आहे.

चिंचोली ब. गावाला यापूर्वी शिराळा पाचखेडी योजनेअंतर्गत रायगव्हाण येथून सुरळीत पाणीपुरवठा होत होता. मात्र, वीजबिल थकल्यामुळे हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर योजनेचे थकीत वीजबिल भरूनही व्याजाच्या रकमेचा प्रश्न पुढे करून गेल्या सात वर्षांपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेली पाइपलाइन उपलब्ध असून जलसाठ्यातही पुरेसा पाणीसाठा आहे. असे असतानाही केवळ थकीत वीजबिलाच्या व्याजामुळे पाणीपुरवठा बंद ठेवणे अन्यायकारक असल्याची भूमिका राजकुमार सुरवसे यांनी मांडली.

सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आणि भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. (Shiv Sena Water Supply Protest) पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शिराळा पाचखेडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत इतर काही गावांना पाणीपुरवठा सुरू असताना चिंचोली ब. गावातील ग्रामस्थांचा काय दोष? स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना विनाकारण पाण्यापासून वंचित का ठेवले जात आहे, असा सवालही सुरवसे यांनी उपस्थित केला.

यांची होती उपस्थिती...
प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन चिंचोली ब. गावाचा पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू करावा. अन्यथा, रायगव्हाण येथे जलसमाधी घेण्यात येईल, असा इशाराही राजकुमार सुरवसे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या (Shiv Sena Water Supply Protest) मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य राजकुमार सुरवसे, हणमंत डबडे, इंद्रजित नवले, श्रीनाथ कणसे, संजय भडंगे, आकाश भालेकर, ओमकार कुमठेकर, खंडू भालेकर, व्यंकट दयाळ, हणमंत शिंदे, आत्मलिंग शेटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.