शिवसेना शिंदे गट

माजी आमदार टारफेंसह ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील शिंदेसेनेत

Shiv Sena Shinde Group: मुंबई येथे ४ ऑक्टोबर बुधवार रोजी ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार, जिल्हा प्रमुख, उपप्रमुखासह आजी माजी पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना शिंदे गटात

माजी आमदार टारफेंसह ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील शिंदेसेनेत

Shiv Sena Shinde Group

 

ठाकरे सेनेला जिल्ह्यात खिंडार; आ. संतोष बांगरांच्या नेतृत्वात शिवसेनेत झाला प्रवेश 

आखाडा बाळापूर (Shiv Sena Shinde Group) : मुंबई येथे ४ ऑक्टोबर बुधवार रोजी ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार, जिल्हा प्रमुख, उपप्रमुखासह आजी माजी पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना शिंदे गटात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. संतोष बांगर, खासदार नागेश पाटील आष्टीकर प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघ माजी आ.डॉ. संतोष टारफे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय पाटील सावंत, उपजिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डी.के.दुर्गे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, माजी सभापती नागोराव करंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील साळुंखे, रमेश जाधव, एस.पी. राठोड,गजानन अवचार, माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, शिवसेना तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, अरूण पिंपरे, बापुराव घोंगडे, सरपंच पाशा पटेल,सह आजी माजी पदाधिकारी यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, इत्यादी उपस्थित होते. 

 माजी आ. संतोष टारफे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय पाटील सावंत यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे सेनेला मोठा झटका बसला आहे दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधि या पक्षप्रवेशामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर नेतृत्वाखाली शिवसेना ग्रामीण भागात अधिक बळकट होण्यासाठी यामुळे राजकीय दृष्ट्या फायदा होईल असे चित्र आहे.

टैग्स: Shiv Sena Shinde Group

संबंधित सामग्री

परभणीतील पाथरीत शिवसेना शिंदे गटाला धक्का; दोन नगरसेवकांचे राजीनामे

परभणीतील पाथरीत शिवसेना शिंदे गटाला धक्का; दोन नगरसेवकांचे राजीनामे

Pathri Shiv Sena Shinde Group: पाथरी नगरपालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, प्रभाग क्रमांक ७ मधील शिवसेना शिंदे गटाच्या दोन नगरसेवकांनी पदाचा राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकडे दिला आहे.

Nov 12, 2026
सुनील तटकरे बेईमान माणूस, अजित पवारांच्या घातपातात हात आहे का? रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

सुनील तटकरे बेईमान माणूस, अजित पवारांच्या घातपातात हात आहे का? रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

रामदास कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोपांचा भडिमार! अजित पवारांच्या कथित घातपात प्रकरणात चौकशीची मागणी; महायुतीत राजकीय खळबळ.

Nov 09, 2026
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत फेरबदल; शिंदेंनी सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत फेरबदल; शिंदेंनी सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली

​​​​​​​एनडीएमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत फेरबदल झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.

Aug 17, 2026
गंगापूर विधानसभा युवा सेना संपर्कप्रमुखपदी ऋषिकेश बोडखे यांची निवड

गंगापूर विधानसभा युवा सेना संपर्कप्रमुखपदी ऋषिकेश बोडखे यांची निवड

गंगापूर येथील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले ऋषिकेश रामानंद बोडखे यांची शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेच्या गंगापूर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

May 16, 2026
हिंगोलीत शिंदे शिवसेना गटाच्या महिला आघाडीचे 'थाळी बजाओ' आंदोलन; काँग्रेसचा जाहीर निषेध

हिंगोलीत शिंदे शिवसेना गटाच्या महिला आघाडीचे 'थाळी बजाओ' आंदोलन; काँग्रेसचा जाहीर निषेध

आंदोलनाचे नेतृत्व पूर्णपणे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले.

Apr 18, 2026