बार्शीटाकळी भीषण दुष्काळ संकट

दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा श्वास गुदमरतोय: शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार

Barshitakali drought crisis: सर्वत्र भीषण दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. शेतात खरिपातील विविध पिके घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च केल्यावरही शेतकऱ्यांचे खरीपाचे पीक नष्ट झाले..

दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा श्वास गुदमरतोय: शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार

Barshitakali drought crisis

 

23 ऑक्टोबरला समृद्धी महामार्ग अडविणार; शिवसेनेचा इशारा

बार्शीटाकळी (Barshitakali drought crisis) : सर्वत्र भीषण दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. शेतात खरिपातील विविध पिके घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च केल्यावरही शेतकऱ्यांचे खरीपाचे पीक नष्ट झाले असन जमिनीत ओलावा व पाणी नसल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही गेला आहे. सरकारने जाहीर केलेली 5000 ची मदत म्हणजे शेतकऱ्यांना नाक व तोंड दाबून बुक्क्यांचा मार देण्यासारखे आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी 30 ऑक्टोबरला समृद्धी महामार्ग अडविण्यात येणार असून शेतकरी व शेतमजुरांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार यांनी शेतकऱ्यांच्या सभेत केले आहे. 

बार्शीटाकळी तालुक्यात दिनांक 27 ऑक्टोबरला शिवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख मुकेशमुरूम कार, मुर्तीजापुर संघटक तथा बार्शीटाकळी तालुका खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष योगेश लाहोडकार, शिवसेनेचे नेते तथा माजी जि प सदस्य गोपाल भटकर,तालुकाप्रमुख गजानन मानतकार, माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य किशोर ठाकरे, उपतालुकाप्रमुख अरविंद काकड, नितीन इंगळे, युवा नेते रुद्राक्ष राठोड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जीवन इंगळे, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख प्रमोद ढोरे, नरेंद्र मते अशा अनेक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दगड पारवा, तिवसा, महान, झोडगा, हातोला, भेंडगाव ,पिंजर अशा विविध गावात शेतकरी व शेतमजूर संवाद दौरा आयोजित केला होता.

झोडगा येथील सभेत मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख मुरूमकर म्हणाले की, (Barshitakali drought crisis) चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी विविध पिके घेण्यासाठी महागडे बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके ,तणनाशके, इंधन व मजुरी अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च करून शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तुर ,ऊस, हळद, भुईमूग, ज्वारी ,बाजरी ,मुंग उडीद,तीळ, अशा विविध पिकाप्रमाणेच भाजीपाला व वेलवर्गीयपेरणी केली होती. अनेक शेतकऱ्यांनी फळबागा लावले आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण केले. अशातच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी दुकानदाराकडून खरेदी केलेले विविध सोयाबीन बियाणे उगवलच नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता.

सुरुवातीपासूनच पावसात खंड वारंवार थंड पडत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील अनेक पिके नष्ट झालीत. पावसात 21 दिवसाचा खंड पडल्यानंतर शेतकऱ्यांना 25% पीक विमा किंवा मोठ्या प्रमाणात पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणे आवश्यक होते. परंतु शासनाने या पद्धतीत बदल केल्याने कोणत्याच प्रकारची पीक विम्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. तसेच शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची नुकसान भरपाई ही तूट पुंजा स्वरूपाची आहे. सद्यस्थितीलाभीषण दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांचाश्वास गुदमरतोय. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांची व मजुरांना पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी. तसेच केंद्र व राज्य सरकारला जाब विचारण्याकरिता शेतकऱ्यांच्या हिताकरिता दिनांक 30 ऑक्टोबरला नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वनोजा फाटा येथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे अशा प्रकारचे आव्हान केले आहे.

संबंधित सामग्री

पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने बार्शीटाकळी तालुक्यात तांदुळाचा काळाबाजार

पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने बार्शीटाकळी तालुक्यात तांदुळाचा काळाबाजार

Barshitakali Rice Black Market: बार्शीटाकळी तालुक्यात महसूल व पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने तांदूळ खरेदी विक्री व वाहतुकीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून, बार्शीटाकळी पोलिसांनी सोळा चाकी ट्रक

Oct 29, 2026