निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी एल्गार
सेनगाव (Sengaon Congress Protest March) : शेतकरी, कष्टकरी, महिला बचत गट आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सेनगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध करत या मोर्चाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या (Sengaon Congress Protest March) मोर्चादरम्यान आंदोलकांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्या केंद्र व राज्य सरकारचा धिक्कार करत काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मतचोरीच्या आरोपां प्रकरणीनिवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. दुष्काळग्रस्त शेतकर्यांना तात्काळ हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी. फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना एकरी १ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी.
अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पिकांसाठी तात्काळ १ लाख रुपयांचे सहाय्य द्यावे.पशुधन वाचवण्यासाठी तालुक्यात तात्काळ शासकीय चारा छावण्या सुरू कराव्यात. सह्याद्रीच्या डोंगररांगांतील रायगड, कर्जत व भीमाशंकर अभयारण्य परिसरात टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी सुरू असलेली जंगलतोड तात्काळ थांबवावी. मायक्रोफायनान्स कंपन्या, खासगी सावकार आणि बँकांकडून सर्वसामान्य नागरिक व महिला बचत गटांची होणारी सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला दिले. काँग्रेस पदाधिकार्यांची मोठी उपस्थिती होती.
या (Sengaon Congress Protest March) मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश आप्पा सराफ, काँग्रेस किसान संघटनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, सेनगाव तालुका काँग्रेसचे डॉ. नीलकंठ गडदे, प्रभू आप्पा जिरवणकर, गजाननराव देशमुख, विनायकराव देशमुख, रामेश्वर हेंद्रे, यादवराव थिटे आणि प्रकाशराव वाघ या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. तसेच रायाजी चोपडे, यासीन भाई, मजीत भाई, संतोष वायाळ, पंडित देशमुख, संतोष आरे, जगदीश गरड, संतोषराव पोले, ज्ञानबाराव गडदे, गजानन होडबे, मनोहर ठोके, दिनकरराव गडदे, व्यंकटराव गडदे, सुभाषराव पाटील, चवरे साखरा, राजाराम मोटे, भास्कर राठोड, प्रेम घडले, गोपाल गडदे, वैभव गडदे, गौरव गडदे, विवेक गडदे आणि रोहन चवरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.