नगराध्यक्ष वीरू चंद्रमनी जामगडे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा
बिडगाव (Save Democracy, Remove Anarchy) : ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या जनजागृतीच्या उद्देशाने आयोजित पदयात्रेला बिडगाव नगरपंचायत क्षेत्रातून शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पदयात्रेत भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बिडगाव येथे नगराध्यक्ष वीरू चंद्रमनी जामगडे यांच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष निकेश कातुरे, सभापती संतोष तिजारे, प्रीतम बोकडे, भारतीताई देवगडे, भाजपचे सर्व नगरसेवक तसेच भाजपचे बिडगाव अध्यक्ष पुंडलिक कुर्वेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे, जनतेच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करणे आणि अराजकतेविरोधात एकजुटीने उभे राहण्याचा संदेश या (Save Democracy, Remove Anarchy) पदयात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला.
बिडगाव नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हा लोकशाहीवरील विश्वास आणि सामाजिक एकजुटीचे प्रतीक ठरल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजूट आणि जनतेच्या हितासाठी संघर्ष, असा संदेश देत या पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.