Sarpanch Association

सरपंच संघटनेची पातूर तालुका कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी गणेश राठोड, उपाध्यक्षपदी नंदाताई काळे

पातूर तालुका सरपंच संघटनेची नवीन कार्यकारिणी घोषित. अध्यक्षपदी गणेश राठोड, तर उपाध्यक्षपदी नंदाताई काळे यांची अविरोध निवड. ग्रामपंचायतींच्या विकासासाठी कार्यकारिणी प्रयत्नशील राहणार.

सरपंच संघटनेची पातूर तालुका कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी गणेश राठोड, उपाध्यक्षपदी नंदाताई काळे

पातूर  : तालुक्यातील ग्रामपंचायतींचा विकास आणि सरपंचांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत असलेल्या सरपंच संघटनेची नवीन तालुका कार्यकारिणी १३ ऑक्टोबर रोजी घोषित करण्यात आली. पातूर तालुका पंचायत समितीमध्ये आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.

या बैठकीत पातूर तालुका अध्यक्षपदी गणेश हरिश्चंद्र राठोड, तर उपाध्यक्षपदी नंदाताई विठ्ठल काळे यांची अविरोध निवड करण्यात आली.

संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली.

पदाधिकारी :

  • सचिव : विकास वानखडे

  • सहसचिव : सखूबाई विजय अवचार

  • कोषाध्यक्ष : शशिकलाबाई सुरेश महाले

कार्यकारिणी सदस्य :

सुनिताताई सुधीर देशमुख, गजानन धोंडूजी डाखोरे, लक्ष्मीबाई विष्णू ठाकरे, अमोल प्रमोद धायवट, वैशाली पंकज, कविता माने, राजेश भाकरे, आशा सुधाकर कराळे, मीरा पाचपोर, गंगा दिलीप ताजणे आणि अनिता देवकर यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

पातूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सरपंचांच्या विविध प्रश्नांवर ही नवनिर्वाचित कार्यकारिणी सक्रियपणे पाठपुरावा करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

संबंधित सामग्री

रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; 'आधी चित्रपट पाहा, मग विरोध करा!'

रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; 'आधी चित्रपट पाहा, मग विरोध करा!'

रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद यांचा सवाल! 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट आणि सेन्सॉर बोर्डावरून नवा वाद.

Nov 17, 2026
धरणांची पाणीपातळी घसरली; राज्यात केवळ 64 टक्के पाणी शिल्लक!

धरणांची पाणीपातळी घसरली; राज्यात केवळ 64 टक्के पाणी शिल्लक!

Maharashtra Dam Water Storage: धरणांमधील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली असून, राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ 64.17 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा 90.54 टक्के

Nov 16, 2026
बंगालच्या उपसागरात सलग तिसऱ्या चक्रीवादळाचे संकट; ‘अक्वान’ वादळाची शक्यता

बंगालच्या उपसागरात सलग तिसऱ्या चक्रीवादळाचे संकट; ‘अक्वान’ वादळाची शक्यता

Bengal Cyclone Crisis: बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाल

Nov 16, 2026
महाबळेश्वरमधील नामांकित ३ हॉटेलवर FDA चा बडगा! अन्न विक्रीचे परवाने निलंबित; पर्यटकांची तारांबळ

महाबळेश्वरमधील नामांकित ३ हॉटेलवर FDA चा बडगा! अन्न विक्रीचे परवाने निलंबित; पर्यटकांची तारांबळ

महाबळेश्वरमधील ३ नामांकित हॉटेल्सचे FDA कडून अन्न विक्री परवाने निलंबित. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली कारवाईचा धडाका सुरूच!

Nov 16, 2026
दिव्या देशमुख, तेजस्विन शंकर यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव!

दिव्या देशमुख, तेजस्विन शंकर यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव!

National Sports Awards: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉन प्रकारात कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

Nov 13, 2026