औंढा नागनाथ (Sapna Sudhir Munangtiwar) : भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सौभाग्यवती सपना सुधीर मुनंगटीवार यांनी मंगळवारी तारीख.०८आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूचे दर्शन घेऊन महापूजा केली. महापूजा झाल्यानंतर नागनाथ मंदिरात सपना सुधीर मुनंगटीवार यांचा शाल श्रीफळ व नागनाथ मंदिराची प्रतिमा देऊन देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार व सुरेंद्र डफळ व भाजपाचे शरद पाटील व गणेश देशमुख यासह पदाधिकारी यांनी सत्कार केला.
औंढा नागनाथ येथे सपना सुधीर मुनंगटीवार (Sapna Sudhir Munangtiwar) यांचे आगमन होताच फटाक्याची अतिषबाजी करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष शरद पाटील ,भाजप शहराध्यक्ष बबन सोनुने ,मा.नगराध्यक्षा दिपाली पाटील, नगरसेविका अश्विनी पाटील, मा. नगरसेवक गणेश देशमुख गणेश पाटील,, मंदिराचे अध्यक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, सह आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.