Sanjay Rathod

वनार्टीसाठी 19.80 कोटींचा निधी मंजूर! मंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश; 250 कोटींसाठी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

वनार्टीसाठी 19.80 कोटींचा निधी मंजूर! मंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 250 कोटींचे आश्वासन.

वनार्टीसाठी 19.80 कोटींचा निधी मंजूर! मंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश; 250 कोटींसाठी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

भटके-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन आणि प्रशिक्षण योजनांना मिळणार आर्थिक बळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुरवणी मागण्यांमधून 250 कोटी देण्याचे आश्वासन

मानोरा : भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथील वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) या संस्थेला सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी विद्यावेतन आणि प्रशिक्षण खर्चापोटी 19 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंत्री संजय राठोड यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या 'शासन आपल्यादारी' धोरणानुसार मंजूर झालेला निधी विद्यावेतन आणि प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीसाठी वितरित केला जाणार आहे. त्यामुळे भटके-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळण्यासह विविध प्रशिक्षण योजनांचा लाभ घेता येणार आहे.

वनार्टीसाठी 250 कोटींच्या निधीची मागणी

वनार्टीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा विस्तार करण्यासाठी संस्थेला 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंत्री संजय राठोड यांनी राज्य शासनाकडे केली आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्यांमधून 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतची माहिती स्वतः संजय राठोड यांनी दिली.

शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकासाला मिळणार चालना

महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत डीएनपीटी बोर्डाशी संबंधित योजनांचे फायदे पोहोचवण्यासाठी या योजना वनार्टीच्या माध्यमातून राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमामुळे भटके-विमुक्त समाजातील विद्यार्थी आणि तरुणांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, कौशल्य विकास तसेच रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

यासंदर्भात मंत्री संजय राठोड म्हणाले की, भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधींपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रयत्नांतूनच 19.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

वनार्टीसाठी 250 कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठीही आपले प्रयत्न सुरूच राहतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शासनाच्या योजनांचा लाभ योग्य वेळी पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही राठोड यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, 19.80 कोटी रुपयांच्या निधीमुळे वनार्टीच्या विद्यावेतन आणि प्रशिक्षणविषयक योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची अपेक्षा आहे. आता मंजूर निधीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत किती लवकर पोहोचतो, याकडे भटके-विमुक्त समाजाचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

मोफत वीज कागदावरच; शेतकरी मात्र अंधारात!

मोफत वीज कागदावरच; शेतकरी मात्र अंधारात!

Farmers Free Electricity Scheme: शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा सरकारकडून मोठ्या दिमाखात केली जात असली, तरी प्रत्यक्षात अपुरा वीजपुरवठा आणि पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Nov 16, 2026
अमित शाहांच्या पुणे दौऱ्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? संजय शिरसाटांचे मोठे विधान; 'ऑपरेशन टायगर'चीही चर्चा!

अमित शाहांच्या पुणे दौऱ्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? संजय शिरसाटांचे मोठे विधान; 'ऑपरेशन टायगर'चीही चर्चा!

अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात राजकीय घडामोडींचे संकेत! विलिनीकरण आणि ऑपरेशन टायगरवर संजय शिरसाटांचे मोठे विधान.

Nov 16, 2026
पुण्यात अमित शाहांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ! सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा

पुण्यात अमित शाहांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ! सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा

अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंची भेट; शिवसेनेच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत चर्चांना वेग.

'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

डिलिमिटेशनवर चंद्रशेखर बावनकुळेंचे समर्थन, काँग्रेसवर निशाणा! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतही एनडीएच्या भूमिकेचे सूचक संकेत.

Nov 14, 2026