Breaking News
  • दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!
  • धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
  • मराठा बांधवांचा मुंबईकडे ‘गनिमी कावा’; धाराशिवमधून 5 हजार कार्यकर्ते जाणार
  • शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे
  • मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम; सात लाख मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था
  • सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन दाखल
  • अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले - एकनाथ शिंदे
  • नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर कडकडीत बंद

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

साल्हे बालपंचायत

साल्हेतील बालपंचायतीचा प्रशासनाला दणका!

Salhe Balpanchayat: गावातील मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात अखेर साल्हे गावातील बालपंचायतीतील मुलांनीच पुढाकार घेत ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. गट ग्रामपंचायत नवरगाव


साल्हेतील बालपंचायतीचा प्रशासनाला दणका

Salhe Balpanchayat |

 

बंद पथदिवे अन् अस्वच्छ पाण्याच्या टाक्यांवर बालकांचा सवाल
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निवेदन, आठ दिवसांत समस्या सोडविण्याची मागणी

साल्हे/ कोरची (Salhe Balpanchayat) : गावातील मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात अखेर साल्हे गावातील बालपंचायतीतील मुलांनीच पुढाकार घेत ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. गट ग्रामपंचायत नवरगावच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना बालपंचायतीच्या वतीने निवेदन देत गावातील बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत, तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करून त्यात क्लोरीन पावडर टाकावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

साल्हे गावातील (Salhe Balpanchayat) गल्लीतील काही पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण होत असून, लहान मुले व नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत वीज विभागाला माहिती देण्यात आली असतानाही समस्या कायम असल्याचे बालपंचायतीने निवेदनात नमूद केले आहे.

दुसरीकडे, नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी असलेल्या दोन पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने त्या अस्वच्छ झाल्या आहेत. अशा परिस्थितीत दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पाण्याच्या टाक्यांची तातडीने साफसफाई करून त्यात क्लोरीन पावडर टाकण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

“गावातील प्रत्येक मूल सुरक्षित राहावे आणि प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे,” या भूमिकेतून बालपंचायतीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे आपल्या समस्या मांडल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रौढांनी मांडाव्यात अशा मूलभूत प्रश्नांसाठी गावातील बालकांनीच पुढाकार घेतले.