Salary Scam

बनावट आयडीवर बोगस पोलिसांना पगार; वेतनात ६.५ कोटींचा घोटाळा; पाच जणांवर गुन्हा

मुंबई पोलिस दलातील वेतन वितरण प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला असून, या प्रकरणामुळे विभागात खळबळ उडाली आहे.

बनावट आयडीवर बोगस पोलिसांना पगार; वेतनात ६.५ कोटींचा घोटाळा; पाच जणांवर गुन्हा

मुंबई : मुंबई पोलिस दलातील वेतन वितरण प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला असून, या प्रकरणामुळे विभागात खळबळ उडाली आहे. सरकारची तब्बल साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच समतानगर पोलिस ठाण्याशी संबंधित पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बनावट पोलिस सर्व्हिस आयडी आणि डीसीपीएस आयडी तयार करून काही व्यक्तींना पोलिस कर्मचारी म्हणून नोंदवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या नावावर नियमितपणे वेतन मंजूर करण्यात आले. या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून विजया चव्हाण आणि वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा डेटा 'सेवार्थ' प्रणालीतून नव्या प्रणालीमध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असताना हा प्रकार समोर आला. उत्तर प्रादेशिक विभागातून पोलिसांच्या वेतनाचे कामकाज पाहिले जाते. याच ठिकाणी कार्यरत असलेल्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी पोलिस दलाशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींना कर्मचारी म्हणून दाखवत त्यांच्या बँक खात्यांमध्ये वेतनाची रक्कम जमा केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अशा ८ ते १० बोगस व्यक्तींच्या खात्यांमध्ये नियमितपणे पगार वर्ग करण्यात येत होता.

या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा २०१९ आणि २०२० या कालावधीतील आर्थिक ऑडिटदरम्यान झाला. सरकारी तपासणीमध्ये वेतनाच्या रकमेतील तफावत आढळल्यानंतर अधिक सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी ज्या व्यक्तींच्या नावावर वेतन जमा होत होते, त्यांची पडताळणी केल्यानंतर त्या मुंबई पोलिस दलातील कर्मचारीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. या गैरव्यवहाराचा अधिक तपास सुरू असून संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

संबंधित सामग्री

तुकाराम मुंढेंचा FDA मध्ये मोठा ॲक्शन प्लॅन! भिवंडी-नाशिकमधील २० हून अधिक अधिकारी निलंबनाच्या रडारवर

तुकाराम मुंढेंचा FDA मध्ये मोठा ॲक्शन प्लॅन! भिवंडी-नाशिकमधील २० हून अधिक अधिकारी निलंबनाच्या रडारवर

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईची चर्चा; भिवंडी-नाशिकमधील २० हून अधिक अधिकारी निलंबनाच्या शक्यतेत. सुपारी प्रकरणातील चौकशी अहवालात गंभीर त्रुटी.

Oct 17, 2026
पुण्यात IT इंजिनिअरची २७ व्या मजल्यावरून उडी; ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप

पुण्यात IT इंजिनिअरची २७ व्या मजल्यावरून उडी; ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप

पुण्यातील खराडीत आयटी इंजिनिअरच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप; वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल.

Oct 16, 2026
CJP आंदोलनावर दिल्ली पोलिसांची सुप्रीम कोर्टात बाजू; हिंसाचाराच्या भीतीने मोर्चाला परवानगी नाकारल्याचा दावा

CJP आंदोलनावर दिल्ली पोलिसांची सुप्रीम कोर्टात बाजू; हिंसाचाराच्या भीतीने मोर्चाला परवानगी नाकारल्याचा दावा

CJP मोर्चाला परवानगी नाकारण्याच्या निर्णयाचे दिल्ली पोलिसांकडून सुप्रीम कोर्टात समर्थन. इंटरनेट बंदी, रेल्वे रद्द आणि अवमान नोटिसीवर प्रशासनाची बाजू.

Oct 15, 2026
इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; मुंबई पोलिसांची इमिग्रेशन कायद्यानुसार कारवाई

इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; मुंबई पोलिसांची इमिग्रेशन कायद्यानुसार कारवाई

अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावल्याचे वृत्त. ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलन प्रकरणात मुंबई पोलिसांची कारवाई.

Oct 15, 2026
नालासोपाऱ्यात तरुणीची धक्कादायक तक्रार; ‘दोन वर्षांत हिंदू संपतील, धर्मांतर कर’; दबाव आणि मारहाणीचा आरोप

नालासोपाऱ्यात तरुणीची धक्कादायक तक्रार; ‘दोन वर्षांत हिंदू संपतील, धर्मांतर कर’; दबाव आणि मारहाणीचा आरोप

नालासोपारा प्रकरणात आरिफ शेखसह तिघांविरोधात गंभीर आरोप. लग्नाचे आश्वासन, धर्मांतराचा दबाव आणि मारहाणीच्या तक्रारीनंतर पोलिस तपासाकडे लक्ष.

Oct 14, 2026