Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

CJP अभिजित दीपके

खिल्लारच्या शाळेतील दोन शिक्षकांची पदे रिक्त; मुलांसाठी शौचालयही नाही...

CJP Abhijit Deepke:


खिल्लारच्या शाळेतील दोन शिक्षकांची पदे रिक्त मुलांसाठी शौचालयही नाही

CJP Abhijit Deepke |

 

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांचा शाळांना भेटी देत पाहणी दौरा शिक्षणाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा

सेनगाव (CJP Abhijit Deepke) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गाडा शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे अडखळत असतानाच मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचे २९ ऑगस्ट शनिवार रोजी समोर आले. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सेनगाव तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांना भेटी देत शैक्षणिक सुविधांची पाहणी केली. खिल्लार येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत दोन शिक्षकांची पदे रिक्त, मुलांसाठी स्वतंत्र शौचालयाचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी असल्याचे निदर्शनास आले.

दीपके (CJP Abhijit Deepke) यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी, पालक आणि नागरिकांशी संवाद साधत शाळेतील अडचणी जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांबाबतही त्यांनी माहिती घेतली. शाळेत मुलींसाठी शौचालय उपलब्ध असले तरी मुलांसाठी स्वतंत्र शौचालयाची सुविधा आवश्यक असल्याचे समोर आले. तसेच विद्यार्थ्यांना पुरेसे व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकांनी केली.

समस्या समोर येताच अभिजित दीपके (CJP Abhijit Deepke) यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासह मुलांसाठी शौचालय व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केवळ शाळा नव्हे, तर आवश्यक शैक्षणिक आणि मूलभूत सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, सेनगाव तालुक्यातील विविध शाळांचा दौरा सुरू असतानाच सोनम वांगचुक संभाजीनगर येथे येणार असल्याची माहिती दीपके यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी आपला तालुका दौरा अर्धवट थांबवत संभाजीनगरकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला. वांगचुक यांच्या भेटीसाठी ते संभाजीनगरकडे रवाना झाले.

Related to this topic: