Rohna Substandard Road: तालुक्यातील रोहना - बोरव्हा, रोहना - सिंगडोह आणि सिंगडोह - साखरडोह रस्ता व पुलाचे काम कंत्राटदाराने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले
मानोरा (Rohna Substandard Road) : तालुक्यातील रोहना - बोरव्हा, रोहना - सिंगडोह आणि सिंगडोह - साखरडोह रस्ता व पुलाचे काम कंत्राटदाराने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले असुन त्याची देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले असल्याने रस्ता उखडला आहे. तसेच पूलही खचत आहे. त्यामुळे सबंधित दर्जाहीन कामाची निःपक्षपातीपणे चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कार्यवाही करावी, असे मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता वाशिम यांना उबाठा युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख देवा शालिकराम कुऱ्हाडे यांनी पाठविले आहे. .
निवेदनात नमूद केले आहे की, रोहना भागात रोहना - बोरव्हा, रोहना - सिंगडोह, सिंगडोह - साखरडोह या तिन्हीही (Rohna Substandard Road) रस्ता व त्यावरील पुलाचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून कंत्राटदारांनी अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले आहे. शासकीय अंदाजपत्रक नियमाला बगल देवून करण्यात आलेल्या दर्जाहीन कामाची चौकशी करण्यात यावी, यासंदर्भात रोहना ग्राम पंचायत यांनी वारंवार तक्रार करून सबंधित विभागाला अवगत केले आहे. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
रोहना ते बोरव्हा रस्त्यावरील विजय देशमुख यांच्या शेतजवळील पुलावर कठडे न बसवता पुलाचे बांधकाम केले, त्यावेळी त्या बाजूला दगडाची पिचिंग केली नाही. त्यामुळे रस्त्याच्या लगत असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला खोलवर नाल्या पडून पूल खचले आहे. रस्ता करताच तो पूर्णपणे उखडला असुन पुलाचे कठडे न बांधल्यामुळे पूल कटत आहे. सन २०२७ पर्यंत रस्ता व पूल देखरीखीची मुदत असल्याची माहिती मिळाली आहे. (Rohna Substandard Road) त्यामुळे सबंधित विकास कामाची रिपेरिंग करण्यात यावी, व दर्जाहीन काम करणाऱ्या एजन्सीची सखोल चौकशी करून काळया यादीत समावेश करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांना तक्रारकर्त्याने पाठविले आहे.