Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

रिसोड मतदार यादी

रिसोड तालुक्यात प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; १.५५ लाख मतदारांचा समावेश, तर १४ हजारांहून अधिक नावे वगळली

Risod Voter List: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR) अंतर्गत रिसोड तालुक्यातील १८२ मतदान केंद्रांवर आज प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली


रिसोड तालुक्यात प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध १५५ लाख मतदारांचा समावेश तर १४ हजारांहून अधिक नावे वगळली

Risod Voter List |

 

​३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदविण्याची मुदत; ४ नोव्हेंबरला अंतिम यादी होणार जाहीर

रिसोड (Risod Voter List) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR) अंतर्गत रिसोड तालुक्यातील १८२ मतदान केंद्रांवर आज प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत तालुक्यातील १ लाख ५५ हजार ५७१ मतदारांचा समावेश करण्यात आला असून, विविध कारणांमुळे १४ हजार ३०३ नागरिकांची नावे वगळण्यात आली आहेत.

​मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी घरोघरी जाऊन केलेल्या मतदार पडताळणीअंती १,५५,५७१ मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट केली आहेत. तर दुसरीकडे, आवश्यक 'इन्युमरेशन फॉर्म' (Enumeration Form) जमा न होणे, गैरहजर, स्थलांतरित, मृत, दुबार नोंदी व इतर श्रेणीतील १४,३०३ नागरिकांची नावे सखोल तपासणीनंतर वगळण्यात आली आहेत.

​३० सप्टेंबरपर्यंत करता येणार दुरुस्ती
प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या किंवा दुरुस्ती करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित मतदारांनी आपले नाव तपासून आवश्यक कागदपत्रांसह आपले दावे सादर करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे  प्रतिक्षा तेजनकर यांनी केले आहे. प्राप्त दावे आणि हरकतींची छाननी करून २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी तालुक्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

​ऑनलाईन नाव तपासण्याची सुविधा उपलब्ध
मतदारांना आपले व कुटुंबातील सदस्यांचे नाव मतदार यादीत तपासण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपले नाव यादीत तपासून घ्यावे, असे आवाहन तसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी केले आहे.