रिसोड (Risod Municipal Council Staff) : रिसोड नगर परिषदेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे आता शहरातील आरोग्य आणि स्वच्छतेची अत्यावश्यक सेवा पूर्णपणे कोलमडण्याची किंवा गंभीररीत्या प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंत्राटदाराने मागील दोन महिन्यांपासून थकीत असलेले वेतन आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करूनही पीएफ (PF) न भरल्यामुळे कामगार आक्रमक झाले आहेत.येत्या ३० तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास थेट दिवाळीत काम बंद ठेवण्याचा इशारा मुख्याधिकारी नगरपरिषद यांना दिला आहे.
रिसोड शहराची (Risod Municipal Council Staff) रोजची स्वच्छता राखण्याची आणि घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची जबाबदारी घंटागाडीवरील ड्रायव्हर व कामगार पार पाडतात. ही एक अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक आरोग्य सेवा आहे. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे हक्काचे पैसे मिळत नसल्याने हे कर्मचारी आता काम बंद करण्याच्या पवित्र्यात आहेत. जर या कामगारांनी ३० तारखेपर्यंत थकीत वेतन व पीएफची रक्कम न मिळाल्यास काम बंद ठेवले, तर शहरात कचऱ्याचे ढीग साचून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
सणाच्या तोंडावर कामगारांना वेतनापासून वंचित ठेवणे आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेचा (PF) निधी रोखून धरणे यामुळे संबंधित कंत्राटदराच्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणाऱ्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांकडे असे दुर्लक्ष केल्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात शहरातील स्वच्छता व्यवस्था आणि कचरा संकलनाची यंत्रणा ठप्प होऊन नागरिकांचे हाल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आता या (Risod Municipal Council Staff) प्रकरणी संबंधित कंत्राटदार काय तातडीची पावले उचलतात आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संबंधित ठेकेदाराची मागील सर्व देयक प्रदान करण्यात आली आहे कर्मचाऱ्याचे ईपीएफ भरल्याची चलान सादर न केल्याने ऑडिटला अडचणी येत असल्याने पुढील देयकास विलंब लागेल असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे
रिसोड नगर परिषद घंटागाडी कर्मचारी
घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले, तर हक्काचा 'पीएफ'ही खात्यात जमा नाही..दिवाळीत काम बंद करण्याचा इशारा!
Risod Municipal Council Staff: रिसोड नगर परिषदेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे आता शहरातील आरोग्य आणि स्वच्छतेची अत्यावश्यक सेवा पूर्णपणे कोलमडण्याची किंवा गंभीररीत्या..
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Risod Municipal Council Staff