वाशिम (Risod Market Committee) : जिल्ह्यातील दुष्काळी व गंभीर परिस्थितीमुळे रब्बी हंगामात काढणीस आलेली शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याअभावी अक्षरशः वाळू लागली आहेत. या भीषण संकटात सापडलेल्या पिकांना तातडीने जीवदान मिळावे, तसेच मेहकर, रिसोड आणि वाशिम तालुक्यातील लाखो नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एप्रिल-मे महिन्यापर्यंत सोडवला जावा, यासाठी मेहकर तालुक्यातील 'पेनटाकळी मध्यम प्रकल्पाचे' पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात यावे, अशी आक्रमक व महत्त्वाची मागणी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी थेट जलसंपदामंत्री मा. श्री. गिरीशजी महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हळद व तूर पिके धोक्यात
सध्याच्या पीक परिस्थितीचा आढावा घेतल्यास, खरीप हंगामात मोठ्या कष्टाने पेरलेली आणि आता रब्बीत काढणीस आलेली पिके पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे धोक्यात आली आहेत. मेहकर, रिसोड आणि वाशिम तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील नगदी पिकांमध्ये मोडणारी हळद, तूर यांसह इतर पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. या पिकांना वाचवण्यासाठी पेनटाकळी धरणातून किमान दोन आवर्तने पैनगंगा नदी पात्रात सोडणे काळाची गरज बनली आहे, असे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी नमूद केले आहे.
७२ टक्क्यांहून अधिक जलसाठा उपलब्ध, पण...
मिळालेल्या माहितीनुसार, पेनटाकळी धरणात ऑक्टोबर अखेर तब्बल ७२.१६ टक्के म्हणजेच ४३,२८० द.ल.घ.मी. इतका मजबूत पाणीसाठा शिल्लक आहे. असे असतानाही, प्रशासकीय दिरंगाई व लालफितीच्या कारभारामुळे पैनगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे (को.प.) बंधारे व बॅरेज अद्याप पूर्णपणे भरल्या गेलेले नाहीत. हे सर्व बंधारे तातडीने भरून घेतल्यास या भागातील लाखो नागरिकांचा आणि मुक्या जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आगामी उन्हाळ्याच्या दिवसांत (एप्रिल ते मे) सुटू शकतो.
तातडीने आदेश काढण्याची मागणी
या अत्यंत महत्त्वाच्या व गंभीर विषयाची दखल घेऊन, पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी संबंधित यंत्रणेला आणि अधिकाऱ्यांना तातडीने आदेशित करावे, अशी आग्रही विनंती सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी जलसंपदामंत्र्यांकडे केली आहे. या निवेदनाची एक प्रत माहिती तथा पुढील कार्यवाहीसाठी कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे मंडळ कार्यालय, नागपूर यांनाही पाठवण्यात आली आहे. आता यावर शासन आणि प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण वाशिम जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
पेनटाकळी धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडा; सभापती विष्णुपंत भुतेकर यांची जलसंपदामंत्र्यांकडे आक्रमक मागणी!
Risod Market Committee: जिल्ह्यातील दुष्काळी व गंभीर परिस्थितीमुळे रब्बी हंगामात काढणीस आलेली शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याअभावी अक्षरशः वाळू लागली आहेत. भीषण संकटात सापडलेल्या पिकांना तातडीने जीवदान
Risod Market Committee
संबंधित सामग्री
रिसोड बाजार समितीचा मोठा निर्णय: यार्डबाहेर शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना मज्जाव
Risod Market Committee: दुष्काळी परिस्थिती आणि घटलेले कृषी उत्पादन लक्षात घेता, रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने एक महत्त्वाचा व कठोर निर्णय घेतला आहे. बाजार समितीच्या मुख्य यार्ड..
बाजार मधील बांधकामे नियमाकुल करूनच विकास करा'
Risod Bazar Samiti: रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीने स्थानिक नियोजन प्राधिकरणाची मंजुरी घेऊनच विकास करण्याचा नियम बेधडक खाली टाकला.
हळदीच्या आवकीने रिसोड बाजार समिती गजबजली; विक्रमी लिलावावर शेतकऱ्यांचे शिक्कामोर्तब
Risod Bazar Samiti: रिसोड बाजार समितीत हळदीच्या आवकीने विक्रमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.