रिसोड बाजार समिती

रिसोड बाजार समितीचा मोठा निर्णय: यार्डबाहेर शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना मज्जाव

Risod Market Committee: दुष्काळी परिस्थिती आणि घटलेले कृषी उत्पादन लक्षात घेता, रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने एक महत्त्वाचा व कठोर निर्णय घेतला आहे. बाजार समितीच्या मुख्य यार्ड..

रिसोड बाजार समितीचा मोठा निर्णय: यार्डबाहेर शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना मज्जाव

Risod Market Committee

 

नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

​रिसोड (Risod Market Committee) : परिसरातील दुष्काळी परिस्थिती आणि घटलेले कृषी उत्पादन लक्षात घेता, रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने एक महत्त्वाचा व कठोर निर्णय घेतला आहे. बाजार समितीच्या मुख्य यार्डबाहेर परस्पर शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना खरेदी करण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला असून, संबंधित व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून अधिकृत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

​चालू हंगामात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी, आगामी काळात बाजार समितीमधील शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आवक कमी झाल्यास (Risod Market Committee) बाजार समितीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊन आर्थिक ताण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

​या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे आर्थिक हित आणि कामकाज सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने सभापती विष्णुपंत भुतेकर व सचिव विजय देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच्या आवाराबाहेर (यार्डबाहेर) खाजगी जागेत किंवा परस्पर होणाऱ्या शेतमाल खरेदी-विक्रीवर तात्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली आहे. सर्व व्यवहार अधिकृतपणे मुख्य यार्डमध्येच व्हावेत, यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.

​बाजार समिती (Risod Market Committee) प्रशासनाने या संदर्भात यार्डबाहेर शेतमाल खरेदी करणाऱ्या संबंधित सर्व व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून नियमांची जाणीव करून दिली आहे. या आदेशाचे कोणीही उल्लंघन करून अनधिकृतपणे खरेदी सुरू ठेवल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही बाजार समिती प्रशासनाने दिला आहे.

टैग्स: Risod Market Committee

संबंधित सामग्री

पेनटाकळी धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडा; सभापती विष्णुपंत भुतेकर यांची जलसंपदामंत्र्यांकडे आक्रमक मागणी!

पेनटाकळी धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडा; सभापती विष्णुपंत भुतेकर यांची जलसंपदामंत्र्यांकडे आक्रमक मागणी!

Risod Market Committee: जिल्ह्यातील दुष्काळी व गंभीर परिस्थितीमुळे रब्बी हंगामात काढणीस आलेली शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याअभावी अक्षरशः वाळू लागली आहेत. भीषण संकटात सापडलेल्या पिकांना तातडीने जीवदान

Oct 26, 2026
बाजार मधील बांधकामे नियमाकुल करूनच विकास करा'

बाजार मधील बांधकामे नियमाकुल करूनच विकास करा'

Risod Bazar Samiti: रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीने स्थानिक नियोजन प्राधिकरणाची मंजुरी घेऊनच विकास करण्याचा नियम बेधडक खाली टाकला.

May 19, 2026
हळदीच्या आवकीने रिसोड बाजार समिती गजबजली; विक्रमी लिलावावर शेतकऱ्यांचे शिक्कामोर्तब

हळदीच्या आवकीने रिसोड बाजार समिती गजबजली; विक्रमी लिलावावर शेतकऱ्यांचे शिक्कामोर्तब

Risod Bazar Samiti: रिसोड बाजार समितीत हळदीच्या आवकीने विक्रमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

Apr 16, 2026