क्रांतिकारी शेतकरी संघटना

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जाब विचारताच वसुलीसाठी आलेल्या खाजगी फायनान्सच्या कर्मचार्‍यांनी काढला पळ

Revolutionary Farmers' Organization: सेनगाव तालुक्यातील मौजे वाघजाळी गावात खाजगी फायनान्सच्या वसुलीच्या तगाद्यावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हस्तक्षेप...

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जाब विचारताच वसुलीसाठी आलेल्या खाजगी फायनान्सच्या कर्मचार्‍यांनी काढला पळ

Revolutionary Farmers' Organization

गोरेगाव (Revolutionary Farmers' Organization) : सेनगाव तालुक्यातील मौजे वाघजाळी गावात खाजगी फायनान्सच्या वसुलीच्या तगाद्यावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हस्तक्षेप केल्यानंतर वसुलीसाठी आलेल्या कर्मचार्‍यांना गावातून पळ काढावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणार्‍या वाघजाळी गावात ३ ऑक्टोबर रोजी विदर्भातील रिसोड येथील खाजगी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्मचार्‍यांनी कर्जदार महिलांकडे वसुलीसाठी तगादा लावला होता. सततच्या तगाद्यामुळे भूमिहीन शेतमजूर महिलांवर आपली घरे विक्रीला काढण्याची वेळ आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मुख्यमंत्री यांनी वसुलीसाठी जबरदस्ती करू नये असे सांगितले असतानाही कर्मचारी गावात येऊन दबाव आणत असल्याचा आरोप महिलांनी केला होता. या घटनेची माहिती मिळताच दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी वाघजाळी गावात धाव घेतली.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे (Revolutionary Farmers' Organization) मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह इतर पदाधिकारी व शेतकऱ्यांनी वसुलीसाठी आलेल्या खाजगी फायनान्सच्या कर्मचार्‍याला फैलावर घेत जाब विचारला आणि रोखठोक भूमिका मांडली. संघटनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर संबंधित कर्मचार्‍यांनी गावात परत वसुलीसाठी न येण्याच्या अटीवर गावातून पळ काढला. या कारवाईनंतर गावातील कर्जदार नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून गावात समाधानाचे वातावरण आहे. खाजगी फायनान्स कंपन्यांनी वसुलीत मानवी दृष्टिकोन ठेवावा अशी मागणी यानिमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळात दिलासा देण्याऐवजी घरकुल रद्द करणे म्हणजे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ! 

दुष्काळात दिलासा देण्याऐवजी घरकुल रद्द करणे म्हणजे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ! 

Vinayak Sarnaik: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, हा शासनाचा उद्देश आहे. मात्र, जागेचा अभाव, आर्थिक अडचणी, रेतीची अनुपलब्धता, बांधकाम साहित्याचा वाढलेला खर्च.

Oct 14, 2026
पाच हजार रुपयांत दिवाळी-दसरा साजरा करायचा कसा? क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संतप्त सवाल

पाच हजार रुपयांत दिवाळी-दसरा साजरा करायचा कसा? क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संतप्त सवाल

Revolutionary Farmers' Organization: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरड्या दुष्काळाने बाधित तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी प्रति शेतकरी पाच हजार रुपयांची मदत जाहीर, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ.

Oct 14, 2026
दुष्काळाच्या पोकळ शासन निर्णयाची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथे होळी

दुष्काळाच्या पोकळ शासन निर्णयाची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथे होळी

Revolutionary Farmers' Organization: सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकरी भीषण पावसाअभावी संकटात सापडलेला असताना शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळासंदर्भातील शासन निर्णयातून शेतकऱ्यांच्या हातात ठोस मदत

Sep 27, 2026
पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये! 

पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये! 

Pik Vima Company: लातूरमध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात शेतकरी संघटनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. खरीप पीक विमा योजनेतील अनियमितता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.

May 08, 2026
हिंगोलीत हळदीचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचा उद्रेक

हिंगोलीत हळदीचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचा उद्रेक

Hingoli Turmeric Farmer: हिंगोलीत हळदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप उसळला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने वाशिम-जिंतूर महामार्गावर हळदीची होळी करत आंदोलन केले.

Apr 22, 2026