क्रांतिकारी शेतकरी संघटना

पाच हजार रुपयांत दिवाळी-दसरा साजरा करायचा कसा? क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संतप्त सवाल

Revolutionary Farmers' Organization: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरड्या दुष्काळाने बाधित तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी प्रति शेतकरी पाच हजार रुपयांची मदत जाहीर, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ.

पाच हजार रुपयांत दिवाळी-दसरा साजरा करायचा कसा? क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संतप्त सवाल

 

भीक मागून आणलेले पाच हजार रुपये उधळून मुख्यमंत्र्यांचा निषेध

गोरेगाव (Revolutionary Farmers' Organization) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरड्या दुष्काळाने बाधित तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी प्रति शेतकरी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने संताप व्यक्त केला आहे. गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर भीक मागून जमा केलेले पाच हजार रुपये उधळून राज्य सरकारच्या घोषणेचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

यंदा कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, हळद आणि कपाशी यांसारखी महत्त्वाची पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलेले नाही. एकीकडे शेतमालाचे नुकसान, दुसरीकडे वाढती महागाई आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

खताची एक बॅग घेणेही महाग झाले असताना मग सण साजरे करायचे कसे, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. दसरा आणि दिवाळी हे सण तोंडावर आले असताना मुलाबाळांना नवीन कपडे घ्यायचे कसे, घरातील सणासुदीचा खर्च भागवायचा कसा आणि शेतीसाठी झालेली आर्थिक तूट भरून काढायची कशी, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहेत.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण हंगामाचे नुकसान झाल्यानंतर केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून सरकार आपली जबाबदारी झटकू पाहत आहे का? शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा आणि मुलाबाळांचे सण आनंदात साजरे व्हावेत, यासाठी पुरेशी मदत देण्याची जबाबदारी सरकारची नाही का? असे संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीचा निषेध करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊभीक मागून पाच हजार रुपये जमा केले आणि त्यानंतर हे पैसे गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर उधळून राज्य सरकारच्या घोषणेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, सखाराम भाकरे, सोनू कावरखे, दीपक सावके, संजय पाटील, केशव आण्णा हे सहभागी होते.

शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली तुटपुंजी रक्कम देण्यापेक्षा त्यांच्या झालेल्या नुकसानीचा गांभीर्याने विचार करून भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त झाली असताना सरकारने जाहीर केलेली मदत ही त्यांच्या नुकसानीच्या तुलनेत अत्यंत अपुरी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.

शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असूनही संकटाच्या काळात त्याच्या पदरी तुटपुंजी मदत पडत असेल तर सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कोरड्या दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल अशी मदत जाहीर करावी, अन्यथा शेतकऱ्यांचा असंतोष अधिक तीव्र होईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जाब विचारताच वसुलीसाठी आलेल्या खाजगी फायनान्सच्या कर्मचार्‍यांनी काढला पळ

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जाब विचारताच वसुलीसाठी आलेल्या खाजगी फायनान्सच्या कर्मचार्‍यांनी काढला पळ

Revolutionary Farmers' Organization: सेनगाव तालुक्यातील मौजे वाघजाळी गावात खाजगी फायनान्सच्या वसुलीच्या तगाद्यावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हस्तक्षेप...

Nov 03, 2026
दुष्काळात दिलासा देण्याऐवजी घरकुल रद्द करणे म्हणजे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ! 

दुष्काळात दिलासा देण्याऐवजी घरकुल रद्द करणे म्हणजे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ! 

Vinayak Sarnaik: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, हा शासनाचा उद्देश आहे. मात्र, जागेचा अभाव, आर्थिक अडचणी, रेतीची अनुपलब्धता, बांधकाम साहित्याचा वाढलेला खर्च.

Oct 14, 2026
दुष्काळाच्या पोकळ शासन निर्णयाची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथे होळी

दुष्काळाच्या पोकळ शासन निर्णयाची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथे होळी

Revolutionary Farmers' Organization: सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकरी भीषण पावसाअभावी संकटात सापडलेला असताना शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळासंदर्भातील शासन निर्णयातून शेतकऱ्यांच्या हातात ठोस मदत

Sep 27, 2026
पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये! 

पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये! 

Pik Vima Company: लातूरमध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात शेतकरी संघटनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. खरीप पीक विमा योजनेतील अनियमितता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.

May 08, 2026
हिंगोलीत हळदीचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचा उद्रेक

हिंगोलीत हळदीचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचा उद्रेक

Hingoli Turmeric Farmer: हिंगोलीत हळदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप उसळला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने वाशिम-जिंतूर महामार्गावर हळदीची होळी करत आंदोलन केले.

Apr 22, 2026