क्रांतीकारी शेतकरी संघटना विनायक सरनाईक

दुष्काळात दिलासा देण्याऐवजी घरकुल रद्द करणे म्हणजे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ! 

Vinayak Sarnaik: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, हा शासनाचा उद्देश आहे. मात्र, जागेचा अभाव, आर्थिक अडचणी, रेतीची अनुपलब्धता, बांधकाम साहित्याचा वाढलेला खर्च.

दुष्काळात दिलासा देण्याऐवजी घरकुल रद्द करणे म्हणजे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ! 

Vinayak Sarnaik

 

विनायक सरनाईक यांची सीईओ कडे तक्रार कारवाई थांबवा अन्यथा आंदोलन 

शासनाच्या निर्गती धोरणानुसार किती लाभार्थ्यांना मोफत रेती मिळाली? विनायक सरनाईक यांचा सवाल

चिखली (Vinayak Sarnaik) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, हा शासनाचा उद्देश आहे. मात्र, जागेचा अभाव, आर्थिक अडचणी, रेतीची अनुपलब्धता, बांधकाम साहित्याचा वाढलेला खर्च, पाणीटंचाई आणि प्रलंबित हप्त्यांमुळे अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण आहेत. अशा परिस्थितीत घरकुल रद्द करण्याची कारवाई करणे अन्यायकारक असून, दुष्काळात अडचणीत सापडलेल्या गरीब कुटुंबांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय केला जात असल्याची टीका क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी केली.

पात्र लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा नसल्यास नियमानुसार जागा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शासन निर्णयांची अंमलबजावणी करून लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याऐवजी घरकुल रद्द करण्याचा मार्ग स्वीकारणे योग्य नाही. दुष्काळामुळे शेतीचे नुकसान झाले असून, अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे अपूर्ण बांधकामासाठी लाभार्थ्यांना पुरेशी मुदतवाढ देऊन प्रलंबित हप्ते तातडीने वितरित करावेत, अशी मागणी सरनाईक यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दि१३ऑक्टोबर २०२६ रोजी निवेदनाद्वारे केली.

घरकुलाचे हप्ते मंजूर करून देण्यासाठी किंवा खात्यावर जमा करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी. त्यात दोषी आढळणाऱ्या अधिकारी किंवा संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

मोफत रेती न दिल्यामुळे त्या लाभार्थ्यांना रक्कम द्या!

शासनाच्या निर्गती धोरणानुसार पात्र घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला अपयश आले असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आता प्रशासनाकडील यादीप्रमाणे घरकुलाचे बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना नियमानुसार रेतीची रक्कम अदा करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली. मोफत रेतीचा लाभ प्रत्यक्षात किती जणांना मिळाला, याची माहितीही प्रशासनाने जाहीर करावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये घरकुल रद्द करण्याची कारवाई थांबवणे, जागा नसलेल्या पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार जागा उपलब्ध करून देणे, बांधकामासाठी मुदतवाढ देणे, प्रलंबित हप्ते वितरित करणे आणि रेतीविषयक प्रश्न मार्गी लावणे यांचा समावेश आहे. या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास घरकुल लाभार्थ्यांसह जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही विनायक सरनाईक यांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जाब विचारताच वसुलीसाठी आलेल्या खाजगी फायनान्सच्या कर्मचार्‍यांनी काढला पळ

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जाब विचारताच वसुलीसाठी आलेल्या खाजगी फायनान्सच्या कर्मचार्‍यांनी काढला पळ

Revolutionary Farmers' Organization: सेनगाव तालुक्यातील मौजे वाघजाळी गावात खाजगी फायनान्सच्या वसुलीच्या तगाद्यावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हस्तक्षेप...

Nov 03, 2026
शेलगाव जहागीर, चंदनपूर, भोरसा-भोरसी येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा; दोन दिवसांत निर्णय न झाल्यास बँकेत आंदोलन

शेलगाव जहागीर, चंदनपूर, भोरसा-भोरसी येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा; दोन दिवसांत निर्णय न झाल्यास बँकेत आंदोलन

Vinayak Sarnaik: सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा चिखली येथे शेलगाव जहागीर येथील शेतकऱ्यांच्या, तर इंडियन ओव्हरसीज बँक, शाखा एकलारा येथे चंदनपूर व भोरसा-भोरसी येथील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम

Oct 27, 2026
पाच हजार रुपयांत दिवाळी-दसरा साजरा करायचा कसा? क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संतप्त सवाल

पाच हजार रुपयांत दिवाळी-दसरा साजरा करायचा कसा? क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संतप्त सवाल

Revolutionary Farmers' Organization: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरड्या दुष्काळाने बाधित तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी प्रति शेतकरी पाच हजार रुपयांची मदत जाहीर, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ.

Oct 14, 2026
हळद पिकाचा ‘ट्रिगर’ लागू करून हळद व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा द्या!

हळद पिकाचा ‘ट्रिगर’ लागू करून हळद व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा द्या!

Vinayak Sarnaik: खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने दीर्घ खंड दिल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर हळद पिकासाठी लागू असलेल्या हवामान धोक्याच्या निकषांचा व शासन निर्णय

Oct 02, 2026
दुष्काळाच्या पोकळ शासन निर्णयाची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथे होळी

दुष्काळाच्या पोकळ शासन निर्णयाची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथे होळी

Revolutionary Farmers' Organization: सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकरी भीषण पावसाअभावी संकटात सापडलेला असताना शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळासंदर्भातील शासन निर्णयातून शेतकऱ्यांच्या हातात ठोस मदत

Sep 27, 2026