Resignation Letter

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदेंचा एकनाथ शिंदेंकडे राजीनामा, पत्रातून मांडली भूमिका

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा. एकनाथ शिंदेंना पत्र लिहून आरोपांबाबत व्यक्त केली खंत.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदेंचा एकनाथ शिंदेंकडे राजीनामा, पत्रातून मांडली भूमिका

Resignation Letter

ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; पक्षाची प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद

ठाणे : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणात आरोपांच्या भोवऱ्यात असलेल्या मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा सादर केला आहे. आपल्याशी संबंध नसलेल्या प्रकरणात नाव जोडून पक्ष नेतृत्वावर दबाव आणला जात असल्याची खंत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी पूर्णेकर कुटुंबीयांकडून गेल्या महिन्याभरापासून केली जात आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने दोघांची चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पक्षांतर्गत दबावामुळे की अन्य कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला, याबाबत चर्चा सुरू आहे.

मीनाक्षी शिंदेंनी पत्रातून काय सांगितले?

मीनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात समाजमाध्यमांवर आणि पक्षीय पातळीवर सुरू असलेल्या आरोपांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. विविध राजकीय पक्ष एकत्र येऊन आपल्यावर आरोप करत असून, त्यातून पक्ष नेतृत्वाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आजवर आपण पक्षासाठी निष्ठेने काम केले असून, पक्षाची किंवा नेतृत्वाची मान खाली जाईल असे कोणतेही कृत्य केलेले नाही, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. ज्या प्रकरणाशी आपला संबंध नाही, त्यामध्ये आपले नाव गोवून एकनाथ शिंदे आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात असल्याने मनाला वेदना होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पक्ष नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी आपण सातत्याने काम केले. मात्र, आता आपल्यावरील आरोपांमुळे त्याच नेतृत्वाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याची शक्यता निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्या निष्ठेची आणि कार्याची दखल आरोपांच्या माध्यमातून घेतली जात असल्याची भावना मनाला त्रास देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी कळवले. हा निर्णय नाराजीपोटी घेतलेला नसून, पक्षाची प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचा सन्मान कायम राखण्याच्या उद्देशाने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भावनांचा विचार केला जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पक्षाकडून कारवाई नाही; स्वतःहून राजीनामा

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मीनाक्षी शिंदे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे हे मानपाडा विभागाचे विभागप्रमुख आहेत.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी सुरू असताना मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले आहे. या निर्णयामुळे पूर्णेकर कुटुंबीयांना काही प्रमाणात दिलासा मिळतो का, याकडे लक्ष लागले आहे.

सध्या मीनाक्षी शिंदे या ठाणे महापालिकेच्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांच्याकडे शिवसेनेच्या ‘लाडकी सून अभियान’ या उपक्रमातील पदाची जबाबदारीही आहे.

संबंधित सामग्री

परभणीतील पाथरीत शिवसेना शिंदे गटाला धक्का; दोन नगरसेवकांचे राजीनामे

परभणीतील पाथरीत शिवसेना शिंदे गटाला धक्का; दोन नगरसेवकांचे राजीनामे

Pathri Shiv Sena Shinde Group: पाथरी नगरपालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, प्रभाग क्रमांक ७ मधील शिवसेना शिंदे गटाच्या दोन नगरसेवकांनी पदाचा राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकडे दिला आहे.

Nov 12, 2026
दोन्ही शिवसेना एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान

दोन्ही शिवसेना एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान

ठाकरे-शिंदे शिवसेना एकत्र येणार? खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; गुलाबराव पाटील आणि भरत गोगावले यांचीही प्रतिक्रिया.

Nov 12, 2026
आमदार परिणय फुकेंच्या मुलावर दारूच्या नशेत कार चालवल्याचा आरोप; हर्षवर्धन सपकाळ आणि सुषमा अंधारे यांची सरकारवर टीका

आमदार परिणय फुकेंच्या मुलावर दारूच्या नशेत कार चालवल्याचा आरोप; हर्षवर्धन सपकाळ आणि सुषमा अंधारे यांची सरकारवर टीका

पेंच अपघातात दिशांत अलीचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी. भाजप आमदार परिणय फुके यांच्या मुलावर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याचा आरोप; सपकाळ-अंधारे आक्रमक.

Nov 12, 2026
मुंबईतील रेल्वे स्टेशनवर भोजपुरी गाणी; 'मुंबईत यूपीचं राजकारण नको!'- संजय राऊत

मुंबईतील रेल्वे स्टेशनवर भोजपुरी गाणी; 'मुंबईत यूपीचं राजकारण नको!'- संजय राऊत

मुंबई रेल्वे स्थानकांवरील भोजपुरी गाण्यांवर संजय राऊत आक्रमक. उत्तर प्रदेशच्या राजकारणावरून इशारा; NCP विलिनीकरणावरही मिश्किल टोला.

Nov 12, 2026
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवल्याने वाद! मनसे आणि ठाकरे गट आक्रमक

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवल्याने वाद! मनसे आणि ठाकरे गट आक्रमक

मुंबईतील वडाळा, सानपाडा आणि आंबिवली रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवल्याने वाद. मनसे आणि ठाकरे गटाने व्यक्त केला संताप.

Nov 12, 2026