Redgaon Car Theft: डोंगरकडा पोलीस चौकी अंतर्गत रेडगाव येथून घरासमोर उभी एक लाख रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली याबाबत आज आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
आखाडा बाळापूर (Redgaon Car Theft) : येथील पोलिस स्थानक हद्दीतील डोंगरकडा पोलीस चौकी अंतर्गत असलेल्या रेडगाव येथून घरासमोर उभी एक लाख रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली याबाबत आज आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रेडगाव येथील गोविंद उत्तम पवार यांनी नेहमीप्रमाणे २७ ऑगस्ट रोजी एक लाख रुपये किंमतीची बुलेट घरासमोर उभी केली होती रात्री बारा ते २८ऑगस्ट सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरांनी सदर दुचाकी लंपास केली.१ सप्टेंबर रोजी दुपारी याबाबत गोविंद उत्तम पवार फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली बिट प्रमुख संतोष नागरगोजे करत आहेत.
हयापूर्वी आखाडा बाळापूर व कळमनुरी पोलीस स्थानक हद्दीतील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. (Redgaon Car Theft) दुचाकी चोरी घटना वारंवार विविध भागात घडत असल्याने यामागे दुचाकी चोरी करणार्या टोळ्या सक्रिय आहे का याचा शोध घेण्याची गरज आहे.