Pusegaon Rastraroko Andolan: सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथील शेतकरी महादेव पोहकर याचा महावितरणच्या कर्मचार्यांच्या निष्काळजी पणामुळे विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद उमटले..
महावितरण कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे पार्डी पोहकर येथील शेतकर्याचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
हिंगोली (Pusegaon Rastraroko Andolan) : सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथील शेतकरी महादेव पोहकर याचा महावितरणच्या कर्मचार्यांच्या निष्काळजी पणामुळे विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी २० सप्टेंबरला सेनगाव-हिंगोली रोडवरील पुसेगाव पाटी येथे रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिसांनी ५९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंतच्या दरम्यान पुसेगाव पाटी, सेनगाव ते हिंगोली रोडवर घडली. जिल्हाधिकारी हिंगोली यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केलेला असताना देखील पार्डी पोहकर आणि खुडज येथील ग्रामस्थांनी बेकायदेशीररित्या जमाव जमवला. त्यांनी अचानकपणे रस्त्यावरील वाहतूक अडवून रस्त्यावर टायर पेटवून दिले, तसेच दगडे आणि लाकडे टाकून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे.
या (Pusegaon Rastraroko Andolan) प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किरण मानसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पार्डी पोहकर येथील विशाल दिलीप पोहकर, वेदांत गजानन पोहकर, हर्षल मुरली पोहकर, जीवन वामन पोहकर, हनुमान रमेश गिरी, दिपक दयाळू पोहकर, गोपाल सुखदेव पोहकर, महादेव काशिराम मुडे, जयराम गंगाराम पोहकर, अंबादास किसन घोंगडे, अभिमान सोपान खंदारे, गोविंदा भारत जाधव, दत्ता पांडुरंग पोहकर, गजानन भगवान झाडे, अनिल रामा खडप, गोपाल रुस्तुम पोहकर, समाधान भानुदास पोहकर, शुभम भागवत पोहकर, अनंता सखाराम जाधव, जनार्धन प्रल्हाद पुरी, मंगेश जनार्धन जाधव, सचिन किसन खरात, संदेश चांगदेव पोहकर, सतिष महादा पोहकर, भागवत महादा पोहकर, राहूल प्रकाश झाडे, नवनाथ काशिराम गिरी, प्रभाकर रामा पोहकर, कपिल मधुकर खिल्लारे, सचिन त्र्यंबक वाकळे, एकनाथ निळकंठ पोहकर, बालाजी जगन झाडे, ज्ञानेश्वर निवृत्ती पोहकर, पांडुरंग सुखदेव पोहकर, राजेंद्र निवृत्ती खंदारे, समाधान भानुदास पोहकर, दिपक आत्माराम पोहकर, गजानन सुधाकर गरपाळ, विजय यशवंता खंदारे, विठ्ठल भानुदास पोहकर, समाधान लक्ष्मण गरपाळ, हर्षण विलास खंदारे, शाम हरिव्दार गिरी, धनंजय गजानन पोहकर, प्रकाश बाजीराव पोहकर, मंगेश सुभाष पोहकर, प्रभाकर रामा पोहकर, विजय मनोहर पोहकर, सुमित लाडजी पोहकर, अनिल रमेश पोहकर सर्व रा. पार्डी पोहकर ता. सेनगाव, राजेश लक्ष्मण झाडे रा. खुडज यांच्यासह इतर पाच ते सात अनोळखी इसमांचा समावेश आहे. या घटनेचा पुढील तपास गणेश नरोटे हे करीत आहेत. घटनास्थळी