पूर्णा घरफोडी प्रकरण

परभणीतील पूर्णा येथील घरफोडी उघड; सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

Purna Burglary Case: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पूर्णा येथील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात यश आले आहे. पोलिसांनी १ लाख ४७ हजार ७०० रुपयांचा सोन्या- चांदीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

परभणीतील पूर्णा येथील घरफोडी उघड; सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

Purna Burglary Case

 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन आरोपी ताब्यात, दोघे फरार

परभणी (Purna Burglary Case) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पूर्णा येथील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात यश आले आहे. पोलिसांनी १ लाख ४७ हजार ७०० रुपयांचा सोन्या- चांदीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतर दोघेजण फरार आहेत. 

परभणी हद्दितील घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ४ नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन पूर्णा येथील उड्डाणपुलाजवळ मोकळया जागेत थांबलेल्या दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता संबंधितांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी चरण किसना उर्फ बशा शिंदे उर्फ पवार तसेच एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. तर रघु उर्फ रड्या शास्त्री भोसले, कट्टप्पा उर्फ शिला हनुमंत भोसले हे दोघे जण फरार आहेत.

सदर कारवाईत सोन्या- चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही (Purna Burglary Case) कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. गजेंद्र सरोदे, पोउपनि. चंदनसिंह परिहार, मधुकर चट्टे, पोलीस अंमलदार सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, केशव लटपटे, लक्ष्मण कांगणे, रंगनाथ दुधाटे, गजानन क्षिरसागर, हनुमान ढगे, विलास बहुरे यांच्या पथकाने केली.

टैग्स: Purna Burglary Case