Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पुर्णा-अकोला रेल्वेमार्ग

विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्याकडून पुर्णा-अकोला मार्गाची सर्वंकष पाहणी

Purna-Akola Railway Line: नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी १ सप्टेंबर मंगळवार रोजी पुर्णा छे अकोला दरम्यान रेल्वे पायाभूत सुविधा, परिचालन व्यवस्था आणि सुरू


विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्याकडून पुर्णा-अकोला मार्गाची सर्वंकष पाहणी

Purna-Akola Railway Line |

हिंगोली (Purna-Akola Railway Line) : नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी १ सप्टेंबर मंगळवार रोजी पुर्णा छे अकोला दरम्यान रेल्वे पायाभूत सुविधा, परिचालन व्यवस्था आणि सुरू असलेल्या विकासकामांची सखोल पाहणी केली.

या दौऱ्यात त्यांनी अकोला ते पूर्णा दरम्यान रिअर विंडो निरीक्षण करून मार्गावरील पायाभूत सुविधा आणि परिचालन बाबींचा आढावा घेतला.पाहणी दरम्यान  कामले यांनी पूर्णा, हिंगोली आणि वाशिम स्थानकांवर अमृत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीची पाहणी केली. तसेच बसमत, हिंगोली, वाशिम आणि शिवणी शिवापूर येथील गुड्स शेडच्या कामांची पाहणी करून कामाचा दर्जा आणि वेळेत पूर्णत्वावर भर देण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर त्यांनी अकोला येथील क्रू लॉबी आणि रनिंग रूमच्या सुविधांची पाहणी केली व अकोला-अकोट विभागाशी संबंधित व्यवस्थांचा आढावा घेतला. अकोट रेल्वे स्थानकाची पाहणी करून तेथील प्रवासी सुविधा आणि विकासकामांची माहिती घेतली. विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत तसेच प्रवासी व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुविधांमध्ये अधिक सुधारणा करावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी दौऱ्यात अभियांत्रिकी, परिचालन, वाणिज्य, सिग्नल व दूरसंचार, विद्युत, टीआरएसओ, सुरक्षा, संरक्षा आणि गतिशक्ती विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.