Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > पुणे

Pune Murder Case

पुण्यात दारूच्या नशेत घरी आला, मटण मागितलं; वडिलांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात वडील आणि मुलामधील वादाचे रूपांतर थेट हत्येच्या घटनेत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


 पुण्यात दारूच्या नशेत घरी आला मटण मागितलं वडिलांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

वारजे माळवाडीतील रामनगरमध्ये धक्कादायक घटना; श्रावणात मटणाचे जेवण मागण्यावरून वाद, महेश गायकवाडचा मृत्यू

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात वडील आणि मुलामधील वादाचे रूपांतर थेट हत्येच्या घटनेत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रावण महिना सुरू असताना दारूच्या नशेत घरी आलेल्या मुलाने मटणाचे जेवण करून देण्याचा हट्ट धरला. यावरून वडिलांसोबत झालेल्या वादानंतर झालेल्या मारहाणीत महेश भागवत गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी महेशचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड आणि आई पार्वती भागवत गायकवाड यांना अटक केली आहे.

ही घटना २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत वारजे माळवाडीतील रामनगर परिसरात घडली. या प्रकरणी महेशच्या भावाने पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी वारजे परिसरात पेंटिंगचे काम करतात. त्यांचे आई-वडील आणि लहान भाऊ महेश हे शेजारी राहत होते. महेशचा सुमारे १० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, तो कोणतेही काम करत नसल्याने आणि दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली होती. त्याची पत्नी आणि दोन मुले सध्या माहेरी राहत असून, काही दिवसांपूर्वी महेश आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोटही झाला होता.

महेश एकटाच राहत होता आणि जेवणासाठी तो आई-वडिलांकडे जात असे. कामधंदा नसणे तसेच वारंवार दारू पिऊन घरी येणे यामुळे त्याचे वडील भागवत गायकवाड यांच्यासोबत सातत्याने वाद होत होते. दारू पिऊन घरी आल्यानंतर महेश मांसाहारी जेवणाची मागणी करत असे. मात्र, श्रावण महिना असल्यामुळे घरात मांसाहार केला जात नसल्याने यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते.

२४ ऑगस्टच्या रात्री महेश दारूच्या नशेत घरी आला. त्याने आई-वडिलांकडे मटणाचे कालवण करून देण्याची मागणी केली. श्रावणामुळे घरात मांसाहार बनवला जात नसल्याचे सांगूनही त्याने मटणासाठी आग्रह धरला. यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

वाद वाढल्यानंतर भागवत गायकवाड यांनी महेशच्या तोंडावर आणि डोक्यावर मारहाण केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या मारहाणीत महेशचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर आई पार्वती गायकवाड हिने पतीला मदत केल्याचा आरोप आहे. पतीला वाचवण्याच्या उद्देशाने तिने पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी महेशच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. या घटनेमुळे वारजे माळवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

Related to this topic: