Pune Metro Line 3

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू; PM मोदींच्या हस्ते २१,८०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

पुणे मेट्रोची हिंजवडी-शिवाजीनगर पिंक लाईन सुरू! सकाळी ६ ते रात्री ११.४० पर्यंत सेवा; जाणून घ्या वेळापत्रक आणि सुविधा.

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू; PM मोदींच्या हस्ते २१,८०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

पुणे मेट्रोच्या पिंक लाईनचे उद्घाटन, दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन; पीक अवर्समध्ये दर ६ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या वेळापत्रक आणि कनेक्टिव्हिटी

पुणे : हिंजवडी आयटी पार्क आणि शिवाजीनगरदरम्यान प्रवास करणाऱ्या पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पुणे मेट्रोच्या महत्त्वाकांक्षी पिंक लाईनचे लोकार्पण करण्यात आले असून, यामुळे हिंजवडी आयटी पार्क थेट पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुण्यातील सुमारे २१ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले.

या कार्यक्रमात सुमारे ८ हजार ३०० कोटी रुपयांहून अधिक खर्चातून विकसित करण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या लाईन ३ अर्थात पिंक लाईनचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच १३ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.

या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हिंजवडी ते शिवाजीनगर २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग

पुणे मेट्रोची पिंक लाईन सुमारे २३ किलोमीटर लांबीची असून, ती हिंजवडी आयटी पार्कमधील माण परिसराला शिवाजीनगर येथील डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्थानकाशी जोडते. या मार्गामुळे पुण्यातील महत्त्वाचे आयटी आणि रोजगार केंद्र आता शहराच्या मध्यवर्ती भागाशी थेट जोडले गेले आहे.

हिंजवडीमध्ये कामासाठी दररोज ये-जा करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांसह सामान्य प्रवाशांना या मेट्रो सेवेचा मोठा फायदा होणार आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास कमी होण्यासोबतच प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, एमआरडीएने सवलत करारातील तरतुदींनुसार प्रवासाच्या अंतरावर आधारित अधिकृत मेट्रो भाडेदर निश्चित केले आहेत.

१३,५०० कोटींच्या दुसऱ्या टप्प्यात काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या टप्प्यात मेट्रोचे नवीन मार्ग विकसित करण्याचे नियोजन असून, त्यामुळे पुणे शहरातील विविध भागांना मेट्रो नेटवर्कशी जोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीनंतर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळी ६ ते रात्री ११.४० पर्यंत मेट्रो सेवा

पिंक लाईनच्या प्रवाशांसाठी मेट्रोचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. मेट्रोची पहिली फेरी सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. गर्दीच्या वेळेत म्हणजेच पीक अवर्समध्ये दर ६ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल. तर इतर वेळेत दोन गाड्यांमधील अंतर १२ मिनिटांचे राहणार आहे.

मेट्रोच्या शेवटच्या फेऱ्यांच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत.

  • माण ते जिल्हा न्यायालय: रात्री १०.३० वाजता शेवटची मेट्रो.

  • जिल्हा न्यायालय ते माण: रात्री ११.४० वाजता शेवटची मेट्रो.

जिल्हा न्यायालय स्थानकावरून मिळणार थेट कनेक्टिव्हिटी

पिंक लाईनवरील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर महामेट्रोच्या लाईन १ आणि लाईन २ शी थेट इंटरचेंजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो बदलून शहरातील इतर भागांमध्ये जाणे अधिक सोयीचे होणार आहे.

प्रवाशांच्या तिकीट व्यवस्थेसाठी संयुक्त मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात एनसीएमसी कार्डचाही वापर करता येणार आहे.

हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो सेवा सुरू झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भर पडली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील कामे कधी पूर्ण होतात आणि मेट्रोचे जाळे शहराच्या इतर भागांपर्यंत कसे विस्तारते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

डिलिमिटेशनवर चंद्रशेखर बावनकुळेंचे समर्थन, काँग्रेसवर निशाणा! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतही एनडीएच्या भूमिकेचे सूचक संकेत.

Nov 14, 2026
मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? फडणवीस-शिंदेंना धक्का बसण्याचे संकेत

मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? फडणवीस-शिंदेंना धक्का बसण्याचे संकेत

मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? ५०० कोटींच्या क्लिपनंतर फडणवीस-शिंदेंबाबत मोठे संकेत; SIT चौकशीची मागणी.

Nov 14, 2026
सुनेत्रा पवार थेट 'वर्षा'वर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

सुनेत्रा पवार थेट 'वर्षा'वर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर भेट. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान राजकीय तर्कवितर्कांना उधाण.

Nov 14, 2026
दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच! - छगन भुजबळ

दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच! - छगन भुजबळ

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर छगन भुजबळांचं मोठं विधान! शरद-अजित पवार एकत्र आल्यास जुन्या कार्यकर्त्यांना आनंद होईल, अशी भूमिका.

Nov 13, 2026
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पार्थ पवारांच्या बैठकीत काय ठरलं? आमदार शंकर मांडेकरांनी केला मोठा खुलासा!

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पार्थ पवारांच्या बैठकीत काय ठरलं? आमदार शंकर मांडेकरांनी केला मोठा खुलासा!

पार्थ पवारांच्या पुण्यातील बैठकीत विलिनीकरणावर चर्चा झाली का? आमदार शंकर मांडेकरांनी बैठकीचा तपशील सांगत महत्त्वाचा खुलासा केला.

Nov 13, 2026