Pune Dengue Cases

पुणेकरांनो सावधान! डेंग्यूचा वाढता धोका, महापालिका ॲक्शन मोडवर

पुण्यात ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे ८४३ रुग्ण; औंध-बाणेरमध्ये सर्वाधिक १५२ रुग्ण. महापालिका आरोग्य विभागाकडून विशेष पाहणी आणि प्रतिबंधात्मक कारवाई.

पुणेकरांनो सावधान! डेंग्यूचा वाढता धोका, महापालिका ॲक्शन मोडवर

Pune Dengue Cases

डेंग्यू नियंत्रणासाठी महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर; आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालयांची पाहणी, हलगर्जीपणा खपवून न घेण्याचा इशारा

पुणे शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव महापालिका प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. ऑक्टोबर महिन्यात शहरात डेंग्यूचे तब्बल ८४३ रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी विविध क्षेत्रीय कार्यालयांचा दौरा करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. डेंग्यू नियंत्रणाच्या कामात निष्काळजीपणा आढळल्यास तो सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

या पाहणी मोहिमेत केवळ आरोग्य विभागाचाच नव्हे, तर बांधकाम, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. नगर रोड, येरवडा, औंध-बाणेर, ढोले पाटील, शिवाजीनगर-घोले रोड, बिबवेवाडी, सिंहगड रोड, विश्रामबागवाडा आणि कसबा पेठ येथील क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्यात आल्या.

संबंधित सहाय्यक आयुक्त आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठका घेऊन डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. परिसरातील स्वच्छता राखणे, पाणी साचणाऱ्या जागांची नियमित तपासणी करणे आणि डासांची पैदास होण्याची संभाव्य ठिकाणे नष्ट करणे यावर विशेष भर देण्यास सांगण्यात आले आहे.

डासोत्पत्ती रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक मोहिमा नियमितपणे राबवाव्यात. तसेच क्षेत्रीय स्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे, अशा सूचना डॉ. बोराडे यांनी दिल्या.

औंध-बाणेर क्षेत्रात डेंग्यूचे सर्वाधिक १५२ रुग्ण

ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीनुसार औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत डेंग्यूचे सर्वाधिक १५२ रुग्ण आढळले आहेत. येरवडा-वडगाव शेरी परिसरात ११० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर केशवनगरमध्ये ७४, कोथरूडमध्ये ७३, नगर रोड-वाघोलीत ७१, कोंढवा-उंड्रीत ६५ आणि सिंहगड रोड परिसरात ५५ रुग्ण आढळले आहेत.

याशिवाय शिवाजीनगर-घोले रोड परिसरात ३३, धनकवडी-सहकारनगरमध्ये २२, तर वानवडी आणि कसबा-विश्रामबागवाडा या दोन्ही भागांत प्रत्येकी २१ रुग्णांची नोंद झाली आहे. या आकडेवारीमुळे शहरातील विविध भागांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.

प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष करू नका – डॉ. नीना बोराडे

डेंग्यूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी नियमितपणे प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. डासांची उत्पत्ती होणार नाही, यासाठी परिसरातील संभाव्य ठिकाणांवर लक्ष ठेवून प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

दिव्या देशमुख, तेजस्विन शंकर यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव!

दिव्या देशमुख, तेजस्विन शंकर यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव!

National Sports Awards: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉन प्रकारात कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

Nov 13, 2026
अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळचे दूधही महागणार

अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळचे दूधही महागणार

अमूल आणि मदर डेअरीनंतर आता गोकुळचे दूधही महागणार? चेअरमन राजेश पाटील यांचे संकेत; शनिवारी नव्या दरांबाबत निर्णय होण्याची शक्यता.

Nov 13, 2026
महाराष्ट्राच्या ईराची जागतिक भरारी! 10व्या वर्षी केले सहा विश्वविक्रम

महाराष्ट्राच्या ईराची जागतिक भरारी! 10व्या वर्षी केले सहा विश्वविक्रम

Ira’s Global Ascent: महाराष्ट्रातील बुलढाणा येथील अवघ्या 10 वर्षीय ईरा आदित्य राऊत हिने स्कूबा डायव्हिंगच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत एका दिवसात सहा जागतिक विक्रम नोंदवले आहेत.

Nov 12, 2026
पुण्यातील ९ गावांचा विकास आराखडा बदलला! कुठे रस्ते अरुंद, तर कुठे आरक्षणांमध्ये बदल?

पुण्यातील ९ गावांचा विकास आराखडा बदलला! कुठे रस्ते अरुंद, तर कुठे आरक्षणांमध्ये बदल?

पुणे महापालिकेच्या ९ गावांच्या विकास आराखड्यात १४३ बदल प्रस्तावित! रस्त्यांची रुंदी, उद्याने, शाळा आणि नागरी सुविधांच्या आरक्षणांमध्ये फेरबदल.

Nov 12, 2026
यवतमाळमध्ये भूकंपाचे धक्के! एकलासपूरमध्ये ३ रिश्टर स्केलची नोंद; नागरिकांमध्ये भीती

यवतमाळमध्ये भूकंपाचे धक्के! एकलासपूरमध्ये ३ रिश्टर स्केलची नोंद; नागरिकांमध्ये भीती

यवतमाळच्या एकलासपूरमध्ये ३ रिश्टर स्केलचा भूकंप! नागरिकांमध्ये भीती, सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नाही.

Nov 09, 2026