SIR प्रक्रियेविरोध मोर्चा

SIR प्रक्रियेविरोधात इंडिया आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

SIR process Protest March: विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने मोर्चा

SIR प्रक्रियेविरोधात इंडिया आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

SIR process Protest March

 

निवडणूक आयोग व शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती (SIR process Protest March) : विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. गर्ल्स हायस्कूल चौकातून दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेल्या या मोर्चात महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी निवडणूक आयोग व शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या ( SIR process Protest March) आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री ॲड.यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगोले, मिलिंद चिमोटे आदींनी केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना गेटवरच थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचले.

यावेळी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. SIR प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, पात्र मतदारांची नावे तातडीने पुनर्नोंदणीत आणावीत, मतदारांना आक्षेप नोंदविण्याची पुरेशी संधी द्यावी तसेच मतदार यादीतील बदलांची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता व घटनात्मक स्वायत्तता सुनिश्चित करण्याबरोबरच नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात आवाज उठविल्याचा उल्लेख करत, आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचीही इंडिया आघाडीने निषेध केला. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी मागणीही करण्यात आली.

‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, मतदारांचा अधिकार वाचवा’
SIR प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदारांच्या हक्कांचा प्रश्न आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित झालेल्या मुद्द्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, मतदारांचा अधिकार वाचवा’, अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख, खासदार बळवंत वानखडे बबलुभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, बबलुभाऊ शेखावत,विलासराव इंगोले, मिलिंद चिमोटे, डॉ.राजीव जामठे (शहर जिल्हाध्यक्ष शरद पवार गट), अनिल जळमकर( जिल्हाध्यक्ष शरद पवार गट) सुनील मेटकर (जिल्हा सचिव भाकप), AISF च्या राज्य सचिव प्रतीक्षा ढोके, हरिभाऊ मोहोड, कांचनमाला गावंडे,प्रदीप देशमुख, प्रकाश काळबांडे,मुकद्दर खाँ पठाण, शैलेश गवई, प्रवीण मनोहर, हरेराम मालवीय,प्रमोद दाळू,किशोर देशमुख, नामदेव तनपुरे, अरविंद लंगोटे, प्रदीप देशमुख,राहुल येवले,सुनील गावंडे,संजय बेलोकर,पप्पू होले, मुकुंद देशमुख, अभय देशमुख,गजानन देशमुख, शैलेश मालवीय, नितेश वानखडे, गौरव वैद्य, हेमंत येवले, राजा खान, भूषण कोकाटे, श्रीकांत झोडपे, विपुल भडांगे, विलास बोरेकर, अमोल चिमोटे, वैभव वानखडे,कैलास आवारे,मोहन सिंघवी, चंदू डहाणे, अमोल देशमुख इत्यादी उपस्थित होते.

‘‘आता माघार नाही. मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावाच लागेल. अन्यथा इंडिया आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडू. मतदारांच्या अधिकारासाठी आमचा हा लढा यापुढेही सुरूच राहील.’’
-अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस