Prostitution Racket

सांगलीतील लॉजवर पोलिसांचा छापा; देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका

सांगली शहरातील सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील आर्या लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला.

सांगलीतील लॉजवर पोलिसांचा छापा; देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका

Prostitution Racket

आर्या लॉजवरील कारवाईत एका आरोपीविरोधात गुन्हा; गणेश तुपे आणि प्रवीण शिंदे फरार

सांगली शहरातील सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील आर्या लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका केली असून, या प्रकरणात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी दोन संशयित फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

आर्या लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ‘फ्रीडम फर्म’ या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या प्रकरणाची पडताळणी केली. त्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केली आणि त्यानंतर लॉजवर कारवाई केली.

पोलिसांनी लॉजवर छापा टाकताच परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या कारवाईत दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या महिलांना जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात आणण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली.

या प्रकरणात नितीन मनोहर चौगुले (वय ३५, रा. नागाव, ता. वाळवा) हा महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई केली आहे.

दरम्यान, या रॅकेटमध्ये मुंबईतील चेंबूर येथे राहणाऱ्या गणेश तुपे आणि प्रवीण शिंदे या दोघांचीही नावे समोर आली आहेत. हे दोन्ही संशयित सध्या फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा आणि बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

संबंधित सामग्री

‘लहरा दो तिरंगा’ मार्चपूर्वी दिल्ली पोलिसांची अभिजीत दीपके यांच्या घरी धडक; अटकेची शक्यता?

‘लहरा दो तिरंगा’ मार्चपूर्वी दिल्ली पोलिसांची अभिजीत दीपके यांच्या घरी धडक; अटकेची शक्यता?

दिल्लीतील ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी अभिजीत दीपके यांच्या घरी पोहोचले पोलीस. कॅनॉट प्लेसमध्ये कडेकोट बंदोबस्त; सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार.

Oct 16, 2026
CJP आंदोलनावर दिल्ली पोलिसांची सुप्रीम कोर्टात बाजू; हिंसाचाराच्या भीतीने मोर्चाला परवानगी नाकारल्याचा दावा

CJP आंदोलनावर दिल्ली पोलिसांची सुप्रीम कोर्टात बाजू; हिंसाचाराच्या भीतीने मोर्चाला परवानगी नाकारल्याचा दावा

CJP मोर्चाला परवानगी नाकारण्याच्या निर्णयाचे दिल्ली पोलिसांकडून सुप्रीम कोर्टात समर्थन. इंटरनेट बंदी, रेल्वे रद्द आणि अवमान नोटिसीवर प्रशासनाची बाजू.

Oct 15, 2026
मेट्रोतील एका सीटसाठी जीवघेणा वाद! ४८ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, निवृत्त IAS अधिकारी अटकेत

मेट्रोतील एका सीटसाठी जीवघेणा वाद! ४८ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, निवृत्त IAS अधिकारी अटकेत

दिल्ली मेट्रोत सीटवरून झालेल्या वादात ४८ वर्षीय पवन शर्मा यांचा मृत्यू. निवृत्त IAS अधिकारी आणि त्यांच्या मुलाला अटक; न्यायालयाकडून १४ दिवसांची कोठडी.

Oct 12, 2026
आलेगाव ग्रामपंचायतीतील बोगस जन्म नोंदणी घोटाळा उघड; ४ ग्रामसेवकांसह संबंधितांवर गुन्हे दाखल!

आलेगाव ग्रामपंचायतीतील बोगस जन्म नोंदणी घोटाळा उघड; ४ ग्रामसेवकांसह संबंधितांवर गुन्हे दाखल!

आलेगाव ग्रामपंचायतीतील १,१०१ बोगस जन्म दाखल्यांच्या प्रकरणात SIT चौकशीनंतर चार ग्रामसेवकांसह संबंधितांवर चान्नी पोलिसांत गुन्हा दाखल.

Oct 10, 2026
गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

वर्ध्यात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप; पाच अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल. रेल्वे स्थानकातील CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू.

Sep 26, 2026